Nagpur-Ratnagiri Highway Agrowon
ॲग्रो विशेष

Nagpur-Ratnagiri Highway : नागपूर-रत्नागिरी महामार्गासंदर्भात शेतकऱ्यांनी नोंदविल्या हरकती

High WayLand Acquisition : भारतीय किसान संघाच्या नेतृत्वाखाली हातकणंगले, करवीर, शिरोळ येथील शेतकऱ्यांनी नागपूर-रत्नागिरी महामार्गासंदर्भात आपल्या हरकती नोंदवल्या. जमिनीसाठी चौपट मोबदला, महामार्गाचा जुना आराखडाच कायम ठेवा, आवश्यक त्या ठिकाणी पूल उभारा यासह विविध मागण्यांसदर्भात शेतकऱ्यांनी आपले म्हणणे मांडले.

Team Agrowon

Kolhapur News : कोल्हापूर ः भारतीय किसान संघाच्या नेतृत्वाखाली हातकणंगले, करवीर, शिरोळ येथील शेतकऱ्यांनी नागपूर-रत्नागिरी महामार्गासंदर्भात आपल्या हरकती नोंदवल्या. जमिनीसाठी चौपट मोबदला, महामार्गाचा जुना आराखडाच कायम ठेवा, आवश्यक त्या ठिकाणी पूल उभारा यासह विविध मागण्यांसदर्भात शेतकऱ्यांनी आपले म्हणणे मांडले. याबाबतचे निवेदन तहसीलदार स्वप्नील पवार यांना देण्यात आले.

नागपूर-रत्नागिरी महामार्गाचे भूसंपादन बहुतांश पूर्ण झाले आहे. महामार्गाचे कामही गतीने सुरू आहे. मात्र, याबाबत बाधित शेतकऱ्यांना आपल्या हरकती नोंदवण्यासाठी शासनाने मुदत दिली होती. त्यामुळे करवीर, हातकणंगले, शिरोळ या तालुक्यांतील शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयात हरकती नोंदवण्यासाठी आले.

या वेळी त्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदनही दिले. समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनासाठी चौपट मोबदला दिला. मग नागपूर-रत्नागिरी महामार्गासाठी केवळ दुप्पट मोबदला का दिला जात आहे.
या महामार्गाच्या भूसंपादनासाठीही चौपट मोबदला मिळावा. या महामार्गाचा जुना आरखडा निश्चित करून महामार्ग केल्यास कमी सुपीक जमीन घ्याली लागेल.

त्याप्रमाणे जुना आराखडाच निश्चित करावा. काही ठिकाणी पूल बांधून महामार्ग नेल्यास सुपीक जमीन संपादित करावी लागणार नाही. त्यातून महामार्ग होईल तसेच शेतीही टिकेल. या महामार्गासाठी अनेक विहिरी कायमच्या बुजवण्यात येणार आहेत. या विहिरींवर शेती बरोबरच उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी नागरिक अवलंबून असतात. त्यामुळे या विहिरींबाबत प्रशासनाने काय भूमिका घेतली, हेदेखील स्पष्ट करणे आवश्यक आहे.

महामार्ग बनवताना कृषक जमीन, गावे यांची नैसर्गिक सलगता टिकवणे आवश्यक आहे. मात्र, महामार्गाचा आराखडा लक्षात घेता ही सलगता टिकणार नाही. त्यातून भविष्यात अनेक समस्या निर्माण होणार आहेत. त्यामुळे याबाबतही प्रशासनाने उपाययोजना करणे आवश्यक आहे. यासह विविध हरकती नोंदवण्यात आल्या आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rain Crop Damage: एका दिवसात ८४६८ हेक्टरला फटका

Ahilyanagar Crop Damage: अहिल्यानगरमध्ये पूर्वमोसमी पावसाचा पिकांना फटका

Food Processing License: अन्नप्रक्रिया परवाना नूतनीकरणाची अट रद्द

Revenue Department: शासकीय तिजोरीत ६१ हजार कोटी रुपयांचा महसूल जमा

Lemon Price Drop: ऐन उन्हाळ्यात लिंबांच्या दरात घसरण

SCROLL FOR NEXT