Farmer Protest Agrowon
ॲग्रो विशेष

Farmer Loan : कर्जमाफीसाठी सहकारमंत्री वळसे-पाटील यांच्या घरासमोर शेतकऱ्यांचं आंदोलन

मंचर येथील घरासमोर शुक्रवारी (ता.१६) कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केलं आहे. पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, या मागणीसाठी नेवासा तालुक्यातील करजगाव येथील शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारलं आहे.

Dhananjay Sanap

राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मंचर येथील घरासमोर शुक्रवारी (ता.१६) कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केलं आहे. पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, या मागणीसाठी नेवासा तालुक्यातील करजगाव येथील शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारलं आहे. २०१७ साली राज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली. परंतु या योजनेतून ७० टक्के शेतकऱ्यांना लाभ मिळाला. उर्वरित ३० टक्के शेतकरी पात्र असूनही कर्जमाफीपासून वंचित राहिले. या पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, यासाठी शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलन सुरू केलं आहे.

२०१७ च्या कर्जमाफी योजनेत करजगाव येथील २१२ शेतकरी पात्र असूनही वंचित राहिले. कारण २०१९ मध्ये सत्तांतर झालं. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आलं. महाविकास आघाडी सरकारने महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना राबवली. त्यामुळे २०१७ ची योजना मागे पडली. परंतु २०२२ मध्ये पुन्हा भाजप आणि शिंदे शिवसेना यांनी एकत्र सरकार स्थापन केलं. त्यावेळी २०१७ च्या योजनेतील पात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची घोषणा केली. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी होईल असं वाटत होतं. परंतु अद्यापही शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली नाही.

आंदोलक शेतकऱ्यांनी मागील चार दिवस करजगाव येथे आंदोलन केलं परंतु या आंदोलनाची दखल न घेतल्यामुळे गुरुवारी (ता.१५) सायंकाळी आंदोलक शेतकऱ्यांनी मंचरमध्ये सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या घरासमोर आंदोलन सुरू केलं. यावेळी शेतकरी घोषणा देत आहेत. तसेच कर्जमाफी केली तरच आम्ही माघार घेऊ अन्यथा इथेच विष प्राशन करून आत्महत्या करू, असा इशाराही आंदोलक शेतकऱ्यांनी दिला आहे. त्यामुळे आंदोलन अधिक आक्रमक होण्याची चिन्हं दिसू लागली आहेत.

दरम्यान, आंदोलक शेतकरी कर्जमाफीच्या मागणीवर ठाम आहेत. शुक्रवारी (ता.१६) दुपारी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Scarcity: नाशिक जिल्ह्यात १०८४ गावांमध्ये संभाव्य टंचाई

Local Body Elections: रत्नागिरी,सिंधुदुर्गात उमेदवारांपेक्षा नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

Leopard Sightings: बिबट्याच्या त्रासाने शेतकरी हैराण

Local Body Elections: कोल्हापुरात वैयक्तिक गाठीभेटींना प्राधान्य

Agriculture Festival: ‘कृषिपर्व’ महोत्सवात एआय वर विशेष मार्गदर्शन

SCROLL FOR NEXT