Farmer Protest  Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Irrigation : चणकापूर धरणाच्या आवर्तनासाठी शेतकऱ्यांचा ठिय्या

Chankapur Dam : चणकापूर धरणातून रब्बी हंगामाकरिता गिरणा डावा कालव्याद्वारे शेती सिंचनासाठीचे आवर्तन सोडण्यात आलेले नाही.

Team Agrowon

Nashik News : चणकापूर धरणातून रब्बी हंगामाकरिता गिरणा डावा कालव्याद्वारे शेती सिंचनासाठीचे आवर्तन सोडण्यात आलेले नाही. पाण्याअभावी रब्बी हंगामातील पिके धोक्यात आलेले आहे. त्यामुळे रब्बीचे आवर्तन मिळावे यासाठी शेतकरी प्रयत्न करत आहेत.

परंतु प्रशासन दाद देत नसल्याने लाभधारक शेतकऱ्यांनी शनिवार (ता. १५) रोजी मालेगाव पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयासमोर ठिय्या दिला.यावर १९ फेब्रुवारीपासून आवर्तन सोडण्याचे आश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांनी ठिय्या मागे घेतला.

लाभधारकांचे म्हणणे आहे, की शेतकऱ्यांचा जीवामरण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. रब्बी हंगामात पिके घेतली आहे. त्यामुळे पिकांना सिंचनाची गरज आहे. मात्र, असे असताना ते मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी मालेगाव पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता यांच्या दालनासमोर ठिय्या दिला.

यावेळी शेखर पवार,माजी उपनगराध्यक्ष व वांजुळपाणी संघर्ष समितीचे प्रा. के. एन. अहिरे, निखिल पवार, शेखर पगार, माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश पवार, शुभम पवार, वाय. के. खैरनार, प्रवीण पवार, संदीप पवार, चिंतामण पवार, आबा पवार,

प्रवीण वसंत पवार, सुनील पवार, दाजी पवार, सागर पवार,सुनील भगवान पवार, कारभारी पवार, धनंजय पवार, संदीप पवार, सुधीर पवार,अनिल निवृत्ती पवार, सुनील पवार, गणेश पवार, उमेश अहिरे, सयाजी पवार,भारत पवार, प्रफुल पवार आदी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon 2026 In Kerala : मॉन्सूनचं २६ मे रोजी केरळात होणार आगमन; हवामानशास्त्र विभागाचा अंदाज

Monsoon Arrival 2026: माॅन्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान; मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात ५ दिवस पावसाची शक्यता

MSP Hike 2026: शेतीमालांच्या हमीभावाची वाढ अत्यंत तोकडी

Khat Dukan Karvai: : कृषी विभागाकडून १९ निविष्ठा केंद्रांवर सिंधुदुर्गात कारवाई

Onion Procurement: केंद्राकडून राज्यात १२ रुपये ३५ पैशानं कांद्याची खरेदी सुरु, मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती

SCROLL FOR NEXT