Farmers Protest  Agrowon
ॲग्रो विशेष

Hirda Procurement : राजूरला आदिवासी मंडळाच्या कार्यालयात घुसून हिरडा ओतला

Farmers Protest : राजूर मुक्काम आंदोलनाचा सोमवारी तिसरा दिवस असूनही आदिवासी मंडळाच्या कोणीही आंदोलकांची भेट घेतली नाही.

सूर्यकांत नेटके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagar News : हिरड्याला रास्त भाव जाहीर करा, हिरड्याची सरकारी खरेदी सुरू करा व भंडारदरा धारणात बुडीत बंधारे बांधून आदिवासी गावांना पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी द्या, या प्रमुख मागण्यांसाठी राजूर (ता. अकोले) येथे सुरू असलेले मुक्काम आंदोलन सोमवारी (ता. ८) तिसऱ्या दिवशी तीव्र करण्यात आले. शेकडो कार्यकर्त्यांनी घोषणा देत राजूर येथील आदिवासी विकास महामंडळाच्या कार्यालयात घुसून अधिकाऱ्यांच्या टेबलावर हिरडा ओतून आपला निषेध व्यक्त केला.

राजूर मुक्काम आंदोलनाचा सोमवारी तिसरा दिवस असूनही आदिवासी मंडळाच्या कोणीही आंदोलकांची भेट घेतली नाही. परिणामी आंदोलकांनी आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेतला. अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणातील पाण्यावर जिल्हा सुजला सुफला होतो.

मात्र ज्या आदिवासी शेतकऱ्यांच्या शेतात हे पाणी साठते त्या भंडारदरा धरणाच्या आजूबाजूच्या नऊ गावांना मात्र उन्हाळ्यात ओंजळभर पाण्यासाठी पाच-पाच किलोमीटर चालावे लागते. भंडारदरा धरणात बुडीत बंधारे बांधून या शेतकऱ्यांना पिण्याचे व शेतीचे पाणी द्यावे ही मागणीही आंदोलनात घेण्यात आली आहे.

आदिवासी गावांमध्ये अजूनही वीज नाही. अनेक वाड्यांना रस्ते नाहीत. आंदोलनात हे सर्व प्रश्नही घेण्यात आले आहेत. अकोला तालुक्यात हिरडा खरेदीचा प्रश्नही तीव्र आहे. हिरडा खरेदी करावी आणि हिरड्याला हमीभाव द्यावा या मागणीसाठी राजूर येथे तीन दिवसांपासून आंदोलन सुरू आहे.

जोपर्यंत हे सर्व प्रश्न सुटत नाहीत, नाशिक येथून आदिवासी महामंडळाचे कार्यकारी संचालक राजूर येथे आंदोलनाच्या मंडपात येऊन हिरडा खरेदीबाबत लेखी आश्‍वासन देत नाहीत तोवर आंदोलन मागे घेणार नसल्याचे आंदोलकांनी जाहीर केले.

किसान सभेचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. अजित नवले, सदाशिव साबळे, नामदेव भांगरे, एकनाथ मेंगाळ, राजाराम गंभीरे, ज्ञानेश्वर काकड, शिवराम लहामटे, वसंत वाघ, संगीता साळवे, निर्मला मांगे, कुसा मधे, बहिरू रेंगडे, दूंदा मुठे, लक्ष्मण घोडे, गणपत मधे, नवसु मधे, भरत झडे, श्रमिक मुक्ती दलाचे स्वप्नील धांडे, भाकपचे ओंकार नवाळी यांच्यासह मोठ्या प्रमाणात शेतकरी आंदोलनात सहभागी झाले आहेत. सोमवारी रात्रीही मुक्काम सत्याग्रह सुरूच राहणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orange Fruit Drop: शुक्लकाष्ठ फळगळीचे!

Pimpalapur Farmer Death Assistance: पिंपळापूर येथील आत्महत्याग्रस्त कुटुंबाची प्रशासनाकडून भेट; शासकीय योजनांचा लाभ देण्याची कार्यवाही

New Gram Panchayat Schemes: ग्रामपंचायतींसाठी पाच नव्या योजनांना मंजुरी

Cibil Score Issue: कर्जमुक्ती योजनेमुळे सिबिल स्कोअरवर परिणाम : तुपकर

Farmer Protest Warning: ‘डीबीटी’साठी शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT