Climate Change Agrowon
ॲग्रो विशेष

Climate Change : पावसाने शेतकरी हवालदिल

बदलत्‍या हवामानाचा आंबा, काजूच्या उत्पादनाला फटका बसला आहे. अनेक ठिकाणी मोहर गळला आहे.

Team Agrowon

Unseasonal Rain News : आठवडाभरापासून तालुक्‍यात ढगाळ वातावरण (Cloudy Weather) आहे. मंगळवारी सकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्‍याने आंबा, काजू, कडधान्य पीक धोक्‍यात आले आहे. वीटभट्‌टी व्यावसायिकांचेही मोठे नुकसान झाले असून गुरांचे वैरणही भिजले आहे.

लांबलेल्या पावसाने वीटभट्टी व्यवसाय यंदा उशिराने सुरू झाला. ढगाळ वातावरणामुळेही मातीच्या वीटा सुकण्यास विलंब लागला. त्‍यात गेल्‍या आठ दिवसांपासून सुरू असलेल्‍या अवकाळीने वीटभट्टीमालक चिंतेत आहेत.

बदलत्‍या हवामानाचा आंबा, काजूच्या उत्पादनाला फटका बसला आहे. अनेक ठिकाणी मोहर गळला आहे. तर पावसामुळे फळगळती झाली आहे. शेतकऱ्यांनी माच करून ठेवलेली वैरण भिजली असून गुरांच्या दाणा-पाण्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

रब्‍बी हंगामातील कडधान्ये भिजली असून काढणी व झोडणी लांबणीवर केली आहे. पिके बाधित झाल्‍याने शेतकऱ्यांच्या उत्‍पन्नावरही परिणाम होणार आहे. रेवदंड्यातील काही भागात वीज पुरवठा खंडित झाला होता. लालपरीचे वेळापत्रक कोलमडले. मुख्य रस्त्यावर वाहने घसरण्याचे किरकोळ प्रकार घडले.

ढगाळ वातावरण, अवकाळी पावसामुळे कडधान्य पिकांसह सर्वच पिकांचे नुकसान होत आहे. फळ पिके व वैरणवर परिणाम होऊन शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होण्याची शक्‍यता आहे.
बाळाराम भोनकर, शेतकरी
यंदा रब्‍बी हंगामातील कडधान्य व इतर पिकांची चांगली लागवड झाली आहेत. मात्र अचानक आलेल्‍या पावसामुळे हातातोंडाशी आलेले पीक वाया जाण्याची भीती शक्‍यता आहे. बदलत्‍या हवामानामुळे पिकावर रोगराई पसरण्याचा धोका बळावला आहे.
दत्ताराम यादव, शेतकरी, माणगाव

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

New Gram Panchayat Schemes: ग्रामपंचायतींसाठी पाच नव्या योजनांना मंजुरी

Cibil Score Issue: कर्जमुक्ती योजनेमुळे सिबिल स्कोअरवर परिणाम : तुपकर

Farmer Protest Warning: ‘डीबीटी’साठी शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

Mechanical Paddy Transplanting: चिखलगावात यांत्रिक पद्धतीने भात लागवड

Onion Tomato Report: कांदा, टोमॅटोचा अहवाल १५ ऑगस्टपर्यंत सादर करा: पाशा पटेल समितीला निर्देश

SCROLL FOR NEXT