Akola News : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेमध्ये ज्या शेतकऱ्यांनी गेल्या महिन्यात आधार प्रमाणीकरण केले आहे, अशा अकोला जिल्ह्यातील २० हजार ५१२ शेतकऱ्यांना ८९.४९ कोटी रुपयांचा लाभ देण्यात आला आहे.
महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेअंतर्गत राज्यातील ३३ हजार ३५६ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केले नसल्याचे ऑगस्टमध्ये शासनाच्या निदर्शनास आले होते.
त्यामुळे या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंतच्या प्रोत्साहनपर योजनेचा लाभ मिळाला नव्हता. त्यांना आधार प्रमाणीकरणाची १२ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर २०२४ या कालावधीत संधी देण्यात आली होती.
या कालावधीत आधार प्रमाणीकरण केलेल्या पीककर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या व आधार प्रमाणीकरणाअभावी प्रोत्साहनाच्या लाभापासून वंचित राहिलेल्या ३७४ लाभार्थी शेतकऱ्यांना एक कोटी ७२ लाख रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आले आहेत.
जिल्ह्यातील १०८ एवढे शेतकरी आधार प्रमाणीकरण करण्यापूर्वी मयत झाले असून त्यांच्या वारसांच्या नोंदी करण्याचे काम सुरू आहे. अशा शेतकऱ्यांनी वारस प्रमाणपत्राशी संबंधित कागदपत्रे घेऊन संबंधित बँकांशी संपर्क साधावा जेणे करुन वारसांना प्रोत्साहनाचा लाभ देता येईल, असे आवाहन डॉ. जिल्हा उपनिबंधक प्रवीण लोखंडे यांनी केले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.