Farmer Loan Waive Agrowon
ॲग्रो विशेष

Farmer Loan Waive : कर्जमाफीसाठी १९ मार्चला शेतकऱ्यांचा मुंबईत निर्णायक लढा

Agriculture Loan Waive : संपूर्ण कर्जमुक्ती, पीकविमा, सोयाबीन-कापसाचा भावफरक यांसह शेतकऱ्यांच्या इतर मागण्यांसाठी बुधवारी (ता.१९) शेतकरी मुंबईत धडकणार आहेत.

 गोपाल हागे

Buldana News : संपूर्ण कर्जमुक्ती, पीकविमा, सोयाबीन-कापसाचा भावफरक यांसह शेतकऱ्यांच्या इतर मागण्यांसाठी बुधवारी (ता.१९) शेतकरी मुंबईत धडकणार आहेत. क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात अरबी समुद्रात सातबारे बुडवून शेतकरी कर्जमुक्त झाल्याची घोषणा करणार आहेत.

तसेच सोयाबीन, कापूस बुडवून शासनाचे लक्ष वेधणार आहेत. क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या पुणे येथे तीन मार्च रोजी पार पडलेल्या राज्यव्यापी बैठकीत तुपकरांनी बुधवारी (ता.१९) मुंबईत आंदोलनाचा बॉम्ब फोडणार असल्याची घोषणा केली होती.

शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती, शेतकऱ्यांच्या हक्काचा पीकविमा, सोयाबीन- कापूस भावफरक, नाफेडमध्ये अडकलेली शेतकऱ्यांची रक्कम, रखडलेले अनुदान, उसाला एकरकमी एफआरपी द्यावी यांसह कांदा, दूध, धान व इतर उत्पादनांना मदत मिळण्यासाठी मुंबईत धडक देण्याचा इशारा दिला होता.

त्यासाठी मंगळवारपर्यंत (ता. १८) त्यांनी सरकारला वेळ दिला होता. अद्याप सरकारकडून कोणताच सकारात्मक प्रतिसाद नसल्याने त्यांनी आंदोलनाची ठाम भूमिका घेतली आहे. बुधवारी मुंबईतील नरिमन पॉइंट येथे अरबी समुद्रात आपले सातबारा बुडवून शेतकरी स्वतःला कर्जमुक्त झाल्याचे घोषित करणार आहेत.

या आंदोलनासाठी गावागावांतून शेतकरी मोठ्या संख्येने बाहेर पडण्याची शक्यता आहे. मंगळवारी सकाळी नऊ वाजता बुलडाणा येथील क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या हेल्पलाइन सेंटर समोर सगळे शेतकरी एकत्र जमणार असून, तेथून तुपकर यांच्या नेतृत्वात मुंबईकडे जाणार आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mumbai APMC: मुंबई बाजार समितीच्या कारभाराची होणार चौकशी

Israel Lebanon Conflict: लेबनॉनमध्ये युद्धविराम नाही

White Grub Pest Management: हुमणी किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्गदर्शन मोहीम

Central Government Policy: कांदा, साखर उद्योगांबाबत बुधवारपर्यंत केंद्र निर्णय घेईल : आमदार दिलीप वळसे पाटील

Soybean Oil Demand: अमेरिकेत जैवइंधनासाठी सोयातेलाचा वापर वाढता

SCROLL FOR NEXT