Banana Farmer Protest Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance : रावेरमध्ये केळी फळपीक विमाप्रश्‍नी शेतकऱ्यांचा मोर्चा

Banana Farmer Protest : फळ पीकविमा योजनेतून जळगाव जिल्ह्यातील केळी पिकासाठी विमा संरक्षण घेतलेल्याशेतकऱ्यांना तत्काळ परतावे मिळावेत, या मागण्यांसाठी शेतकरी संघर्ष समितीतर्फे रावेर (जि. जळगाव) येथे मोर्चा काढण्यात आला.

Team Agrowon

Jalgaon News : फळ पीकविमा योजनेतून जिल्ह्यातील केळी पिकासाठी विमा संरक्षण घेतलेल्या सर्व ७७ हजार ८१० शेतकऱ्यांना तत्काळ परतावे मिळावेत, केळी पीक पडताळणी बाबतचा शासन व प्रशासनाने घेतलेला निर्णय मागे घेतला जावा, आदी मागण्यांसाठी शेतकरी संघर्ष समितीतर्फे रावेर (जि. जळगाव) येथे मंगळवारी (ता. ३) मोर्चा काढण्यात आला.

अनेक शेतकरी या मोर्चात सहभागी झाले. सकाळी रावेर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात मोर्चास सुरुवात झाली. पीकविमा आमच्या हक्काचा नाही कोणाच्या बापाचा, कुकुंबर मोझॅक विषाणू (सीएमव्ही) समस्येतून केळीचे नुकसान झाल्यास पात्र विमाधारकांना यासंबंधीदेखील विमा योजनेतून परतावे किंवा नुकसानभरपाई मिळावी आदी मागण्या करण्यात आल्या. यानंतर रावेर शहरातील अंकलेश्‍वर - बऱ्हाणपूर राज्यमार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. रास्ता रोको आंदोलन सुमारे २५ मिनिटे करण्यात आले.

शहरातील पूर्ण वाहतूक यामुळे खोळंबली. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांना कसरत करावी लागली. यानंतर पोलिस व प्रशासनातील मंडळीने शेतकऱ्यांची समजूत काढली व आंदोलन मागे घेण्यात आले.

मोर्चात रघुनाथदादाप्रणीत शेतकरी संघटनेचे किरण गुर्जर, उमेश पाटील, सचिन पाटील, स्वप्नील पाटील, रितेश पाटील, श्रीकांत चौधरी, शशांक पाटील, धीरज पाटील, रमेश पाटील, लीलाधर पाटील आदी सहभागी झाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, वाल्मीक पाटील यांनी देखील केळीचे खांब घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल होत सर्व ७७ हजार केळी विमाधारकांना लवकर परतावे दिले जावेत, अशी मागणी केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT