Farmers' Loan Waiver Agrowon
ॲग्रो विशेष

Farmers' Loan Waiver : शेतकऱ्यांची कर्जमाफीची अपेक्षा अपूर्ण; विश्वजीत कदमांनी व्यक्त केली खंत

Loan Waiver : कर्जबाजारी शेतकरी आहेत, ज्यांच्या डोक्यावर कर्ज आहे. नैसर्गिक आपत्तीला तोंड देणाऱ्या शेतकऱ्यांना लाडक्या बहिणीसारखी मदत केली जाईल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. पण ती अपेक्षा पूर्ण केली गेली नाही, असं विश्वजीत कदम म्हणाले.

Dhananjay Sanap

Vishwajeet Kadam : राज्य सरकारने अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण केल्या नाहीत, अशी खंत कॉँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम यांनी व्यक्त केली. कदम बुधवारी (ता.१२) अर्थसंकल्पावर बोलत होते. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या अपेक्षावरून सरकारनं निराशा केल्याचंही सांगितलं.

आमदार कदम म्हणाले, "शेतकऱ्यांना अर्थसंकल्पाकडून मोठे अपेक्षा होत्या. निवडणुकीच्या आधी आश्वासनांची खैरात महायुतीच्या नेत्यांनी सांगितली होती. त्यामध्ये शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याची अपेक्षा होती. कर्जबाजारी शेतकरी आहेत, ज्यांच्या डोक्यावर कर्ज आहे. नैसर्गिक आपत्तीला तोंड देणाऱ्या शेतकऱ्यांना लाडक्या बहिणीसारखी मदत केली जाईल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. पण ती अपेक्षा पूर्ण केली गेली नाही." असं विश्वजीत कदम म्हणाले.

शेतकऱ्यांना या अर्थसंकल्पात थेट मदत केली जाईल, असं वाटत होतं. २०१९-२० मध्ये सांगली जिल्ह्यात महापुरामुळं शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. क्षारपडमुळे शेतकऱ्यांचं पीक येत नाही. दुष्काळाचा फटका बसला. शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभावही मिळत नसल्याच्या परिस्थितीकडे कदम यांनी सभागृहाचं लक्ष वेधलं. तसेच शेतकऱ्यांचा अपेक्षा अर्थसंकल्पात पूर्ण करण्यात आल्या नाहीत, अशी खंत व्यक्त केली.

दरम्यान, राज्यातील शेतकऱ्यांना महायुतीच्या नेत्यांनी निवडणुकीपूर्वी कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफीची अपेक्षा होती. परंतु अर्थसंकल्पात कर्जमाफीचा निर्णय न घेतल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्य सरकारला कर्जमाफीचा विसर पडला आहे, अशी भावनाही शेतकरी व्यक्त करत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

Ahilyanagar Karjmafi : अहिल्यानगरला तिसऱ्या टप्प्यात ८८ कोटी ८१ लाखांची कर्जमाफी

SCROLL FOR NEXT