PM Kisan Scheme  Agrowon
ॲग्रो विशेष

PM Kisan Scheme : यवतमाळमध्ये शेतकऱ्यांना २३२ कोटींच्या अर्थसाहाय्याचे वितरण

Farmer Financial Assistance : राज्य व केंद्र शासनाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासोबतच त्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात आहे.

Team Agrowon

Yavatmal News : नापिकी, दुष्काळ आणि वातावरणातील बदल यामुळे गेल्या काही वर्षांत शेतकऱ्यांना सातत्याने संकटांचा सामना करावा लागत आहे. अशास्थितीत त्यांना धीर देण्यासाठी केंद्र शासनाने पंतप्रधान किसान सन्मान निधी व त्याच धर्तीवर राज्य शासनाने नमो किसान महासन्मान निधी योजना सुरू केली. या दोन्ही योजनेतून यावर्षी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना २३२ कोटींचे अर्थसाहाय्य वितरित करण्यात आले आहे.

राज्य व केंद्र शासनाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासोबतच त्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. विविध योजनांच्या माध्यमातून अनुदानदेखील दिले जाते. सोबतच त्यांना रोख रक्कम देऊन त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न शासन करीत आहे.

शेतकऱ्यांना निश्‍चित उत्पन्न देण्याकरिता केंद्र शासनाने पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे. या योजनेच्या निकषांनुसार पात्र शेतकरी कुटुंबास दोन हजार प्रति हप्ता याप्रमाणे तीन समान हप्त्यात प्रतिवर्षी सहा हजार त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. ही योजना शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासा देणारी ठरली आहे.

केंद्र शासनाच्या पंतप्रधान किसान योजनेच्या धर्तीवर राज्यात नमो शेतकरी महासन्मान योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत पीएम किसान पोर्टलवर नोंदणी केलेले व केंद्र शासनाच्या निकषानुसार पात्र असलेले सर्व शेतकरी तसेच पीएम किसान पोर्टलवर नव्याने नोंदणी होऊन लाभ मिळालेले शेतकरीदेखील राज्याच्या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहे.

केंद्राप्रमाणे राज्य शासनाच्या योजनेतून देखील प्रतिहप्ता दोन हजार याप्रमाणे प्रतिवर्षी सहा हजार रुपये दिले जातात. शेतकऱ्यांना दोनही योजनेतून वर्षाला बारा हजार रुपयांचे अर्थसाहाय्य उपलब्ध होते. जिल्ह्यात किसान सन्मानचे २ लाख ८५ हजार ८९७ इतके पात्र शेतकरी आहेत. या सर्व शेतकऱ्यांना नमो महासन्मानचा देखील लाभ दिला जातो.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

E-Peek Pahani: शेतकऱ्यांचं टेन्शन मिटलं! ई- पीक पाहणी प्रक्रियेत मोठा बदल, सहायकांची नियुक्ती, शासन निर्णय जारी

Farmer Fraud: शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करा

Pikvima Scam: पीकविमा अर्जासाठी सीएससी चालकांकडून शेतकऱ्यांची लूट

Dairy Farming: नवतंत्रज्ञानातून दुग्ध उत्पादनात वाढ शक्य

Pik Vima Dharashiv: गतवर्षीच्या खरिपातील पीकविम्याचा मार्ग मोकळा

SCROLL FOR NEXT