Drought In Uttar Pradesh Agrowon
ॲग्रो विशेष

उत्तर प्रदेशातील ६४ जिल्ह्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस

राज्यातील ७५ पैकी केवळ ११ जिल्ह्यांत सरासरी एवढा पाऊस (Rainfall) पडला असून अन्य जिल्ह्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला.

Team Agrowon

उत्तर प्रदेशातील ६४ जिल्ह्यांत या पावसाळ्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. त्यामुळे राज्यातील भात उत्पादक (Paddy Farmer) शेतकरी चिंताग्रस्त असून सरकारकडे मदतीची मागणी करण्यात येत आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (IMD) १९ आगस्टपर्यंतच्या माहितीनुसार, राज्यातील ७५ पैकी केवळ ११ जिल्ह्यांत सरासरी एवढा पाऊस पडला असून अन्य जिल्ह्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला.

येत्या काळात पाऊस पडून ही कसर भरून निघेल, असा आशावाद सरकारी अधिकाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे. जूनपासून पुरेसा पाऊस झालेला नसून पिकांचे नुकसान झाल्याची भावना शेतकऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

पावसाने ओढ दिल्याचा सर्वाधिक फटका राज्यातील भात लागवडीस (Paddy Cultivation) बसला आहे. जौनपूर जिल्ह्यांत सर्वाधिक कमी पावसाची नोंद झाली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार जौनपूरमध्ये सरासरीपेक्षा ७४ टक्के कमी पाऊस झाला.

पावसा अभावी राज्यातील बहुतांशी जिल्ह्यांतील पेरण्या रेंगाळल्या. विशेषतः यावर्षी भात लागवडीखालील (Paddy Cultivation) क्षेत्र घटले. उत्तर प्रदेशातील ३९ जिल्ह्यांत सरासरीच्या केवळ ५० टक्के पाऊस झाला.

शहाजहानपूर, बस्ती आणि पूर्व उत्तर प्रदेशातीळ जिल्ह्यांत दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून भाजप खासदार हरीश द्विवेदी आणि आमदार वीर विक्रम सिंग यांनी यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्याकडे दुष्काळ जाहीर करण्याची मागणी पत्राद्वारे केली.

या परिस्थितीला तोंड देण्यासाठी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन करण्याच्या सूचना राज्य सरकारकडून जिल्हा प्रशासन आणि कृषी शास्त्रज्ञांना देण्यात आल्या आहेत.सरकारकडून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात असून लवकरच दुष्काळ जाहीर केला जाणार असल्याचे उत्तर प्रदेश दुष्काळ निवारण आयुक्त रणवीर प्रसाद यांनी सांगितले. येत्या काळात पुरेसा पाऊस पडेल, असा अंदाज आहे. मात्र ऑक्टोबरपर्यंतचा आढावा घेऊन यासंदर्भातील निर्णय घेतला जाणार असल्याचेही प्रसाद यांनी नमूद केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Industry Problems Solution: साखर उद्योगांसमोरील समस्यांवर उपाययोजना सुचविण्यासाठी समिती

Grape Pruning: द्राक्ष पट्ट्यात ‘खरड’ छाटणी वेगात

Agri Shop License Suspension: पंधरा खत विक्रेत्यांचे परवाने निलंबित

Sanjay Gaikwad Controversy: आमदार संजय गायकवाड यांचे विधान विकृत : सपकाळ

Summer Bajra Harvesting: उन्हाळी बाजरी पीक काढणीच्या अवस्थेत

SCROLL FOR NEXT