Crop Insurance Scheme Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance : जळगाव जिल्ह्यात कापूस पीकविम्याच्या परताव्याची प्रतीक्षा

Cotton Crop Insurance : खरीप हंगामात अतिपावसात हानी झाली. पावसामुळे कापसासह इतर पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतीमालाचे लाखो रुपयांचे नुकसान भरून निघावे, यासाठी शासनाने पंतप्रधान पीकविमा योजना लागू केली आहे.

Team Agrowon

Jalgaon News : जळगाव ः खरीप हंगामात अतिपावसात हानी झाली. पावसामुळे कापसासह इतर पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतीमालाचे लाखो रुपयांचे नुकसान भरून निघावे, यासाठी शासनाने पंतप्रधान पीकविमा योजना लागू केली आहे.

मात्र, शेतकऱ्यांना हजार रुपयांची मदत मिळविण्यासाठी विमा कंपन्यांच्या कार्यालयात फेऱ्या माराव्या लागत आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कापूस पीकविम्याची रक्कम त्वरित द्यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

जिल्ह्यातील सुमारे ४ लाख ५५ हजार ७७९ शेतकरी पंतप्रधान पीकविमा योजनेत सहभागी झाले आहेत. जळगाव जिल्ह्यात सुमारे ४५ महसूल मंडलांत अतिपाऊस झाला. शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे व अवकाळी पावसामुळे कापसासह इतर पिकांचे अतोनात नुकसान झाल्यानंतर त्या शेतकऱ्यांना पीकविमा कंपनीकडे वेळीच पीक नुकसानीच्या तक्रारी नोंदवून व पीकविमा कंपनीच्या प्रतिनिधी यांनी प्रत्यक्ष नुकसानग्रस्त शेतावर जाऊन नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून जवळपास अनेक दिवस झाले.

पण शेतकऱ्यांना पीकविम्याची रक्कम अजूनपर्यंत मिळत नाही. पीकविमा भरताना एक विशिष्ट मुदतीत भरावा लागतो, तसेच पिकांचे नुकसान झाल्यास ७२ तासांच्या आत तक्रार दाखल करावी लागते.

मात्र नुकसानग्रस्त शेतावर पीक पंचनामे करायला कोणतीही मुदत दिली जात नाही, तसेच पीकविम्याची रक्कम देताना कोणतीही ठोस मुदत दिली जात नाही. जिल्ह्यातील सर्व विमाधारक शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसानीच्या रकमा जमा कराव्यात, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT