Milk Rate agrowon
ॲग्रो विशेष

Milk Rate : दूधदरासाठी अकोल्यात उत्पादकांचे बेमुदत उपोषण

Milk Rate Issue : दुधाला किमान ३५ ते ४० रुपये हमी दर मिळावा, यासह विविध मागण्यांसाठी अकोले तहसील कार्यालयासमोर दोन तरुण शेतकऱ्यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

Team Agrowon

Nagar News : दुधाला किमान ३५ ते ४० रुपये हमी दर मिळावा, यासह विविध मागण्यांसाठी अकोले तहसील कार्यालयासमोर दोन तरुण शेतकऱ्यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. अन्य शेतकऱ्यांनी साखळी उपोषण करत त्यात भाग घेतला आहे. या उपोषणाचा शुक्रवारी (ता. २४) दुसरा दिवस होता.

नगर जिल्ह्यासह राज्यात दुधाच्या दरात कमालीची घसरण होत आहे. गेल्या दोन महिन्यांचा विचार करता प्रतिलिटर सुमारे नऊ ते दहा रुपयांनी दर खाली आले आहेत. दुष्काळी परिस्थिती असताना दूध व्यवसाय टिकविण्याचे शेतकऱ्यांसमोर संकट आहे.

खासगी दूध संघचालक दर खाली आणत असताना सरकार मात्र बघ्याची भूमिका घेत आहे. सरकारने तातडीने उपाययोजना करून दूधदरात वाढ करावी, हमी दर द्यावा, यासह विविध मागण्यांसाठी गुरुवारपासून (ता. २३) जनसंघर्ष संघटनेचे अध्यक्ष संदीप दराडे व अंकुश शेटे यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

त्यास पाठिंबा देत मिलिंद नाईकवाडी, भीमाशंकर मालुंजकर, शुभम आंबरे, नीलेश गवांदे, महेश सोनवणे, सत्यम भोर, राम एखंडे, माणिक पांडे, नानासाहेब धुमाळ, शिवाजी नेहे, विक्रम नवले, विष्णू वदक, संदीप शेणकर, मीननाथ पांडे, बाळासाहेब आरोटे, विनोद हांडे, मारुती मेंगाळ, सोमनाथ नवले, नाथू भोर आदींसह शेतकरी सहभागी झाले आहेत. अजूनही प्रशासनाने या उपोषणाची दखल घेतली नाही.

दूध उत्पादकही बिनधास्त

राज्यात गेल्या काही वर्षांपासून खासगी दूध संघाकडून दर पाडत लूट होत आहे, असा आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे. ‘‘दूध दरासाठी २०१६ मध्ये संप झाला होता. त्या वेळी दूध उत्पादक, आंदोलक यांच्या रेट्याने तातडीने प्रतिलिटरमागे ७ ते ८ रुपयांनी वाढ केली होती.

आता मात्र आंदोलन पुकारले तरी दूध उत्पादकच फारसे सहभागी होत नाहीत. राजकीय नेत्यांसाठी वाट्टेल तशी धावपळ करणारे शेतकरी स्वतःचे नुकसान होत असताना मात्र बिनधास्त आहेत, मग लढायचे तरी कोणासाठी?’’ अशी खंत नगरमधील एका सामाजिक कार्यकर्त्याने व्यक्त केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT