Cotton Crop Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Storage : शेतकऱ्यांना भाववाढीची आशा, पण कापसाच्या साठवणूकीमुळे आरोग्य धोक्यात

Cotton Rate : भाववाढीच्या आशेने अजूनही शेतकऱ्यांनी घरातच कापसाची साठवणूक केली आहे. साठवणुकीमुळे आरोग्याचे संकट उभे ठाकले आहे.

Team Agrowon

Yavatmal News : भाववाढीच्या आशेने अजूनही शेतकऱ्यांनी घरातच कापसाची साठवणूक केली आहे. साठवणुकीमुळे आरोग्याचे संकट उभे ठाकले आहे. कापसात किडीचे प्रमाण वाढत असून नागरिकांच्या हातापायला खाज येत असल्याचे प्रकार वाढले आहे.

‘पांढरं सोनं’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कपाशीची जिल्ह्यात पाच लाख हेक्टरवर लागवड केली जाते. यंदा उत्पादनातच घट झाल्याने चांगला दर मिळाला तर उत्पादनातील घट भरून निघेल, अशी शेतकऱ्यांची आशा होती.

मात्र, योग्य भावच मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी घरातच कापूस ठेवला आहे. बाजारात सात ते साडेसात हजार रुपये प्रतिक्विंटल दरात कापूस विक्री करावा लागत असल्याने कापसाची साठवणूक करण्याचा शेतकऱ्यांनी निर्णय घेतला.

आता साठवणूक केलेल्या कापसात हानिकारक कीटक तयार झाले आहेत. आरोग्यावर अपायकारक परिणाम होत असल्याने आता शेतकरी बांधव दुहेरी कोंडीत सापडला आहे. कापसाला लहान-लहान किड्यांनी वेढले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात त्वचेला धोकादायक खाज सुटत असून त्वचेवर लालसर ठिपके पडत आहे.

त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात धाव घ्यावी लागत आहे. कापसामुळे हातापायांवर, पाठीवर, पोटावर मोठ्या प्रमाणात खाज येत आहे. शेतकऱ्यांना कापसाच्या जीवघेण्या खाजेने बेजार केले आहे. ज्या शेतकऱ्यांच्या घरी कापूस भरून आहे, त्याच शेतकऱ्यांच्या घरातील सदस्यांना अंगावर खाज येण्याचा त्रास होत आहे.

यावर उपाय म्हणून काही शेतकरी घरातील कपाशीवर कीडनाशक फवारणी करतात. ही बाब अतिशय धोकादायक असून, घरातील लहान मुले किंवा खाद्य पदार्थांचा धोकादायक औषधांशी संपर्क आल्यास यातून मोठा अनर्थ ओढविण्याची संभाव्य शक्यता आहे.

चार महिन्यांपासून कापूस घरात

गेल्या वर्षी प्रतिक्विंटल कपाशीला चांगला दर मिळाला होता. या वर्षी हे दर चांगले राहतील अशी अपेक्षा आहे. त्यात उत्पादनातही तीस टक्क्यांपर्यंत घट झाली आहे. या भावाने आता कापूस विक्री केला तर मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे भाववाढीची प्रतीक्षा असून, चार महिन्यांपासून कापूस साठवून ठेवला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT