Fertilizer Stock  Agrowon
ॲग्रो विशेष

Fertilizer Stock Info : खतांच्या उपलब्धतेची माहिती ‘ब्लॉग’वर

Fertilizer Storage : खतांच्या उपलब्धतेची माहिती शेतकऱ्यांना उपलब्ध व्हावी यासाठी राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या कृषी विभागामार्फत ब्लॉग तयार करण्याचे निर्देश देण्यात आले होते.

Team Agrowon

Chh. Sambhajinagar News : शेतकरी बांधवांना खतांच्या उपलब्धतेची माहिती व्हावी यासाठी कृषी विभागामार्फत ब्लॉग तयार करण्यात आला आहे. तालुकानिहाय प्रत्येक कृषी केंद्रावर उपलब्ध खतांची माहिती या ब्लॉगवर उपलब्ध करण्यात आली आहे.

आपल्या मोबाइलवरून शेतकऱ्यांना ही माहिती सहजच पाहता येणार आहे. शेतकऱ्यांना विनामूल्य ही माहिती उपलब्ध होणार असल्याने खतांचा काळाबाजार, लिंकिंगसारख्या अपप्रवृत्तींना आळा बसेल व शेतकऱ्यांना लाभ होईल, असे विश्‍वास जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी व्यक्त केला.

खतांच्या उपलब्धतेची माहिती शेतकऱ्यांना उपलब्ध व्हावी यासाठी राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या कृषी विभागामार्फत ब्लॉग तयार करण्याचे निर्देश देण्यात आले होते. या ब्लॉगवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तालुकानिहाय कृषी सेवा केंद्र व त्या प्रत्येक कृषी सेवा केंद्रात उपलब्ध खताच्या प्रकारानुसार गोणी संख्या याची आकडेवारी दिसणार आहे.

बुधवारी (ता. २५) दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात या खत वितरण माहिती ब्लॉगचे ऑनलाइन उद्‍घाटन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते करण्यात आले. सामान्य प्रशासन विभागाच्या उपजिल्हाधिकारी संगीता राठोड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी प्रकाश पाटील आदी उपस्थित होते.

जिल्हा प्रशासनाने राबवलेल्या ‘अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावरती’ या उपक्रमांतर्गत बहुतांश शेतकऱ्यांच्या तक्रारी खत उपलब्धते संदर्भात होत्या. या अनुषंगाने शेतकऱ्यांना खताची उपलब्धता व त्याची माहिती योग्य वेळी व्हावी यासाठी जिल्हा प्रशासनाच्या मार्फत प्रयत्न केले गेले. यामध्ये ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांना खताची उपलब्धता व्हावी यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी देखील या संदर्भात पाठपुरावा कृषी विभागाकडे केलेला होता.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नऊ तालुक्यांमध्ये असणाऱ्या कृषी सेवा केंद्रनिहाय सर्व प्रकारच्या अनुदानित खताच्या उपलब्धतेचा तपशील गोणीच्या संख्येमध्ये नमूद केला आहे. हा ब्लॉग वापरण्यास सोपा असून, शेतकरी बांधवांना अत्यंत सहजपणे वापरता येतो.

ही माहिती केंद्र शासनाच्या आयएमएफएस पोर्टलवरून घेण्यात आली असून यामध्ये दैनंदिन अद्ययावतीकरण केले जाते. यासाठी जिल्हा परिषदचे मोहीम अधिकारी पंकज ताजने यांची नियुक्त करण्यात आली आहे. आयएफएमएस प्रणालीवरील त्यांचा साठा व प्रत्यक्ष असलेला साठा याबाबत असलेली तफावत तत्काळ दूर करतील, अशी माहिती या वेळी देण्यात आली.

कृषी विभागाने तयार केलेल्या ब्लॉगची लिंक-

https://adochhatrapatisambhajinagar.blogspot.com/p/box-sizing-border-box-margin-०-padding_२४.html

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला पूरस्थितीचा आढावा; अतिरिक्त १ हजार ६०० कोटींची मदत जाहीर

Agriculture Technology: धान्य साठवणुकीतून नफ्याचे गवसले तंत्र

Cotton Import Duty: कापूस उत्पादकांच्या अस्तित्वावर घाला

Dragon Fruit Benefits: क्षेत्र वाढते, जाणीव-जागृती वाढवा

Women Empowerment: परभणीतील ग्रामीण भागात ३४ हजार एकल महिला

SCROLL FOR NEXT