Nashik DCC Bank Agrowon
ॲग्रो विशेष

Nashik DCC Bank : नाशिक जिल्हा बँकेविरुद्ध शेतकरी संघटना उभारणार लढा

Farmers Issue : अध्यक्षस्थानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अर्जुन बोराडे होते. या वेळी शेतकरी नेते प्रकाश शिंदे यांनी उच्च न्यायालयातील याचिकेसंदर्भात माहिती दिली.

Team Agrowon

Nashik News : जिल्हा सहकारी बँकेच्या जाचक १०० दिवसांच्या वसुलीविरोधात तसेच जप्ती, लिलाव, १००/८५ अंतर्गत ७/१२ वर नावे लावण्याविरोधात कायदेशीर लढा उभारणार असल्याची घोषणा नाशिक जिल्हा शेतकरी संघटनेतर्फे कसबे सुकेणे (ता. निफाड) येथे शरद जोशी प्रणीत जिल्हा शेतकरी संघटनेच्या शेतकरी मेळाव्यात सोमवारी (ता. १७) करण्यात आली.

शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व शेतकरी संघटना आणि शेतकरी नेत्यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अर्जुन बोराडे होते. या वेळी शेतकरी नेते प्रकाश शिंदे यांनी उच्च न्यायालयातील याचिकेसंदर्भात माहिती दिली.

जिल्हा बँकेच्या प्रत्येक नोटिशीला कायद्यानेच कशाप्रकारे आव्हान द्यावे यासंबंधी मार्गदर्शन केले. तसेच येत्या १५ दिवसांत वरील मागणीसाठी नाशिक येथे सहकुटुंब जनआंदोलन करणार असून सर्व शेतकऱ्यांनी जमीन वाचवण्यासाठी सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले.

या वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष निवृत्ती गारे, शेतकरी नेते रामदास ढिकले, भानुदास ढिकले, प्रहार जनशक्ती जिल्हाध्यक्ष दत्तू बोडके, युवा आघाडी जिल्हाध्यक्ष जगन काकडे, स्वराज्य पक्षाचे निफाड तालुकाध्यक्ष अशोक आहेर, उपसरपंच सचिन मोगल, संजय कावळे, सुरेश शिरसाट, जयराम मोरे, रघुनाथ जगताप यांनी केले.

मेळाव्यासाठी दत्तात्रय शेळके, मनू पाटील, अशोक सोमवंशी, सोमनाथ मोकाट, नामदेव भगत, भाऊसाहेब भंडारे, अशोक भंडारी, दत्तात्रय कडलक, बाळासाहेब बोरस्ते, जगनराव भुसाळ, रमेश बोरस्ते, रमेश जाधव आदींसह शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

ओटीएस सवलत द्या; जाचक वसुली थांबवा

सर्व शेतकऱ्यांनी आणि शेतकरी संघटनांनी कर्जमुक्ती नाहीतर राष्ट्रीय बँकेप्रमाणे एनपीए लागू करून व्याज आकारणी करावी व राष्ट्रीय बँकेप्रमाणे ओटीएस सवलत द्यावी तसेच जाचक वसुली त्वरित थांबवावी,अशी सूचना बैठकीत केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Raisin Making at Home: वेलीवरच सुकवून द्राक्षांपासून बेदाणा तयार करण्याची सोपी पद्धत

Water Withdrawal Ban: चिकोत्रा नदीकाठावर उपसाबंदी

Farm Roads: पेगरगव्हाण शिवारातील ३० वर्षांपासून बंद शेतरस्ते झाले खुले

Irrigation Water Issue: गाळामुळे गडहिंग्लजला पाटबंधारे लघू प्रकल्पातील साठा अल्प

LPG Cylinder Booking: सिलिंडर संपण्याची भीती, बुकिंग ८८ लाखांवर, गॅस टंचाईवर केंद्रानं काय म्हटलं?

SCROLL FOR NEXT