Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage : पाण्याअभावी जळताहेत मारापुरातील पिके

Ujani Dam Irrigation : उजनी कालव्यातील वितरिका क्रमांक ३७ मधून शेती पिकाला उन्हाळी हंगामासाठी अद्याप पाणी सोडण्यात आलेले नाही.

Team Agrowon

Solapur News : उजनी कालव्यातील वितरिका क्रमांक ३७ मधून शेती पिकाला उन्हाळी हंगामासाठी अद्याप पाणी सोडण्यात आलेले नाही. त्यामुळे या लाभक्षेत्रात असलेली पिके सध्या उन्हामुळे व पाण्याअभावी जळून चालली आहेत. कालवा प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने शेतकरी वर्गातून संताप व्यक्त केला जात आहे.

मंगळवेढा तालुका तसा दुष्काळी असला तरी उजनी कालवा व नदीमुळे तालुक्यामध्ये बागायती क्षेत्रात वाढ झाली. कालवा व नदी पट्ट्यातील क्षेत्र हे दहापेक्षा अधिक साखर कारखान्यांना ऊस पुरवठा करीत आहे. त्यामुळे तालुक्यातील कारखानदारीबरोबर शेतकऱ्यांना शेतीतून उत्पन्नाचा आधार सापडला.

गतवर्षी उजनी धरण १०० टक्के भरल्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये उत्साह संचारला आहे. मात्र, याच कालव्यातून उन्हाळी हंगामात वेळेवर पाणी सोडले जात नाही. त्यामुळे उपलब्ध पाण्यावर आलेला जनावरांचा चारा व नवीन उसाचा फुटवा, भाजीपाला व फळपिके सध्या जळून चालली आहेत.

पिके वाळून जाताना पाहताना शेतकरी वर्गातून पाणी सोडण्याची मागणी होत आहे. मात्र कालवा प्रशासन चालढकल करीत आहे. त्यामुळे सध्या सुकलेली पिके हताशपणे बघण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. पिके जतन करून आलेल्या पिकांवर कर्जाचा डोंगर कमी होईल, या आशेवर आलेल्या शेतकऱ्यांची सुकलेल्या पिकामुळे चिंता वाढली आहे.

उन्हाळी आवर्तनातून पाणी सोडले पण अचानक वरून डिस्‌चार्ज कमी झाला. पंढरपुरात कि.मी. ९१ मधून पाणी सुरू असून, त्यातून पूर्ण क्षमतेने विसर्ग मिळाला तर पाणी उपलब्ध होऊ शकेल. येत्या तीन दिवसांत पाणी सोडणे प्रस्तावित आहे.
उन्हाळी आवर्तनातून पाणी सोडले पण अचानक वरून डिस्‌चार्ज कमी झाला. पंढरपुरात कि.मी. ९१ मधून पाणी सुरू असून, त्यातून पूर्ण क्षमतेने विसर्ग मिळाला तर पाणी उपलब्ध होऊ शकेल. येत्या तीन दिवसांत पाणी सोडणे प्रस्तावित आहे. - मानसिंग कुंभार, शाखा अभियंता

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Massive Agricultural Crisis : बळीराजा उद्ध्वस्त! ८ लाख हेक्टरवरील पिके मातीमोल

Satara Rabi Season : सातारा जिल्ह्यात 'रब्बी'ची केवळ ५ टक्केच पेरणी पूर्ण; पाऊस गायब झाल्याने बळीराजा संकटात!

Nar-Par Girna Project : नार-पार, गिरणा नदीजोड प्रकल्पाला तीव्र विरोध; जमिनी आणि पाणी वाचवण्यासाठी शेतकरी एकवटले!

Agriculture Electricity : शेतीपंपांच्या विजेसाठी चामोर्शीत बळीराजा आक्रमक; संतप्त शेतकऱ्यांनी मुख्य रस्त्यावर केला चक्काजाम!

Hingoli Agriculture Crisis : हिंगोली जिल्ह्यात शेती वाचवा अभियान सुरू

SCROLL FOR NEXT