MPKV, Rahuri  Agrowon
ॲग्रो विशेष

Farmer First Project : ‘शेतकरी प्रथम’ प्रकल्प ठरला देशात उत्कृष्ट

MPKV Rahuri : महात्मा फुले कृषी विद्यापीठात सुरू असलेला शेतकरी प्रथम प्रकल्प प्रभावी अंमलबजावणी करणारा प्रकल्प म्हणून या देशातील सर्वोत्कृष्ट प्रकल्प ठरला आहे.

सूर्यकांत नेटके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagar News : महात्मा फुले कृषी विद्यापीठात सुरू असलेला शेतकरी प्रथम प्रकल्प प्रभावी अंमलबजावणी करणारा प्रकल्प म्हणून या देशातील सर्वोत्कृष्ट प्रकल्प ठरला आहे. या प्रकल्पास पालमपूर (हिमाचल प्रदेश) येथे झालेल्या वार्षिक राष्ट्रीय कार्यशाळेत उत्कृष्ट प्रकल्प पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले.

नवी दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन परिषदेचे कृषी विस्तार उपमहासंचालक डॉ. यु. एस. गौतम, प्रकल्पाचे सहसमन्वयक डॉ. रवींद्र निमसे, कृषी विस्तारचे सहाय्यक महासंचालक डॉ. आर. आर. बर्मन, पालनपूर येथील कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डि. के. वत्स, विस्तार शिक्षण संचालक डॉ. नवीन कुमार व नवी दिल्ली येथील कृषी विस्तारचे माजी उपमहासंचालक डॉ. किरण कोकाटे या वेळी उपस्थित होते.

ग्रामीण शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती व्हावी आणि त्यामाध्यमातून शेती विकासाला, महिला सक्षमीकरणाला चालना मिळावी, यासाठी कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प विद्यापीठात राबविण्यात येत आहे. २० राज्यांतील ५२ कृषी विद्यापीठे व भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या केंद्रांवर शेतकरी प्रथम प्रकल्प सुरू आहे.

सुमारे ५० हजार शेतकरी यात सहभागी आहेत. राज्यात केवळ महात्मा फुले कृषी विद्यापीठात गेल्या सहा वर्षांपासून हा प्रकल्प सुरू आहे. यात राहुरी तालुक्यातील चिंचविहिरे, कणगर, तांभेरे, कानडगाव या गावांची निवड केलेली आहे. या ठिकाणी २९२८ पीक प्रात्यक्षिके, ३४ शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम, ७ शेतकरी अभ्यास दौरे, २० शेतकरी-शास्त्रज्ञ चर्चासत्र, ३६ प्रक्षेत्र भेटी व ३४ गट चर्चांद्वारे कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार केला जात आहे.

कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील, विस्तार शिक्षण संचालक, डॉ. सी. एस. पाटील, संचालक संशोधन डॉ. सुनील गोरंटीवार व अधिष्ठाता (कृषी) डॉ. श्रीमंत रणपिसे यांनी प्रकल्पाचे प्रमुख डॉ. पंडित खर्डे, सहसमन्वयक डॉ. सचिन सदाफळ, डॉ. भगवान देशमुख, डॉ. रवींद्र निमसे, वरिष्ठ संशोधन सहयोगी विजय शेडगे, प्रक्षेत्र सहाय्यक राहुल कोऱ्हाळे व किरण मगर यांचे स्वागत केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

LPG Cylinder Supply Issue: ‘उज्ज्वला’च्या डोईवर पुन्हा सरपण

Tur Farming: तूर लागवडीसाठी निवडा योग्य वाण

Farmer Conflict Resolution: अडीच महिन्यात मिटवली ६६३ बांधांची भांडणं

Brazil Cooperative Model: ब्राझीलमधील सहकारी संस्थांची व्यावसायिकता

Farmers Protest: धनगाव येथे कर्जमाफी आदेशाची होळी

SCROLL FOR NEXT