Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage Compensation : शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे अनुदान देण्याची मागणी

Heavy Rainfall Loss : संपूर्ण राज्यासह मंठा तालुक्यात सप्टेंबर २०२४ मध्ये अतिवृष्टी झाली होती. या अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते.

Team Agrowon

Mantha News : संपूर्ण राज्यासह मंठा तालुक्यात सप्टेंबर २०२४ मध्ये अतिवृष्टी झाली होती. या अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. मात्र, याची अद्यापही शेतकऱ्यांना भरपाई मिळाली नाही.

त्यामुळे मंठा येथील शेतकरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक दत्ताराव बोराडे व महादेव बोराडे यांनी शेतकऱ्यांच्या वतीने तहसीलदार सोनाली जोंधळे यांना निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, शासनाकडून नुकतीच सदरील नुकसानीची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये मंठा मंडळ वगळण्यात आले आहे.

मंठा मंडळाचा तत्काळ अतिवृष्टी नुकसान अनुदानामध्ये समावेश करावा. अन्यथा या मागणी करिता मंठा मंडळातील तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करतील, असा इशारा दिला आहे.

निवेदनावर आबासाहेब बोराडे, नानासाहेब बोराडे भगवानराव बोराडे, बाळासाहेब बोराडे, काशिनाथ बोराडे, संतोष बोराडे, संजय बोराडे, दत्तात्रेय बोराडे, सचिन बोराडे, शरद बोराडे, विजय बोराडे, रंगनाथ घनवट, महादेव बोराडे,

जगन्नाथ घनवट, सर्जेराव बोराडे, बालासाहेब घनवट, शरद बाहेकर, महेश बोराडे, शिवाजी शेजुळ, पुंडलिक बोराडे, विष्णु बोराडे, विष्णू शेजुळ, महादेव बोराडे, सिराजखान पठाण, महादेव शेजुळ, सुखदेव बोराडे, शिवाजी बोराडे, किरण बोराडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Inspection: जिल्हाधिकारी शेताच्या बांधावर; पीक पाहणी करून साधला संवाद

Sustainable Aviation Fuel Project: शाश्वत विमान इंधन निर्मिती प्रकल्प ‘नॅचरल’ उभारणार; बी. बी. ठोंबरे यांची माहिती

Crop Insurance Compensation: हवामान मापक यंत्रावरील नोंदणी ग्राह्य धरून पीकविमा परतावा द्या : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

Railway Protest: रेल्वेचा निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार; संगमनेरकरांचा इशारा

Weekly Weather: महाराष्ट्रातून मॉन्सून बाहेर पडण्याच्या मार्गावर

SCROLL FOR NEXT