Crop Insurance  Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance : खरीप हंगामातील पीकविमा त्वरित देण्याची मागणी

Kharif Season Crop Insurance : गेल्या २०२४-२०२५ या वर्षातील खरीप हंगामात नुकसान होऊन पंचनामे झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई म्हणून पीकविमा अजून मिळालेला नाही.

Team Agrowon

Jalgaon News : गेल्या २०२४-२०२५ या वर्षातील खरीप हंगामात नुकसान होऊन पंचनामे झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई म्हणून पीकविमा अजून मिळालेला नाही. लाभ देण्यास विमा कंपनी टाळाटाळ करीत असल्याचा आरोप करीत तालुक्यातील शेतकऱ्यांनी येत्या २८ फेब्रुवारीपर्यंत सरसकट कर्जमाफी न दिल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. या शेतकऱ्यांतर्फे याबाबतचे निवेदन उपविभागीय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे यांना गुरुवारी (ता.२३) देण्यात आले.

यावर्षी खरीप हंगामात सतत जास्तीचा पाऊस व मध्य हंगामात दूषित वातावरणामुळे असंख्य शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे नुकसान झाले आहे. दूषित वातावरणामुळे कपाशीवर अज्ञात रोग व बोंडअळी यामुळे शेतकऱ्यांचे खूप नुकसान झाले आहे. ओरिएंटेड इंस्युरंस कंपनीच्या नियम व धोरणानुसार ४८ तासांच्या आत ऑनलाइन तक्रारीदेखील केल्या आहेत. पीकविमा अधिकाऱ्यांनी नुकसानीचे स्पॉट पंचनामेदेखील केले आहेत.

चार ते पाच महिने उलटूनही ओरिएंटेड इंस्युरन्स कंपनीने शेतकऱ्यांना पीकविमा दिलेला नाही. कंपनी हेतुपुरस्कर विलंब करीत आहे. जिल्हाधिकारी पीकविमा तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष असल्याने त्यांनी याबाबत दखल घेऊन कंपनीला आदेश द्यावेत, अशी मागणी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदन देताना तालुक्यातील दिलीप बाबुराव पाटील, मधुकर कौतिक पाटील, पंढरीनाथ बारीकराव साळुंखे, भास्कर कौतिक पाटील, पप्पू इच्छापूरकर यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, या निवेदनाच्या प्रति जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा अधीक्षक कृषी अधीक्षक व जिल्हा उपनिबंधक यांनादेखील देण्यात आल्या आहेत.

सरसकट कर्जमाफी करा!

शासनाकडून थकीत शेतकऱ्यांना कर्जमाफी व नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान देऊन त्यांची बोळवण केली जाते. तरी शासनाने भेदभाव न करता सरसकट कर्ज माफी द्यावी. जर शासन भेदभाव करीत असेल तर कर्जमाफीसाठी शेतकरी कर्ज भरणार नाहीत आणि ३१ मार्चपर्यंत कर्जमाफी झाली, तर पुढील वर्षी कृषी कर्ज मिळेल. त्यामुळे २८ फेब्रुवारीपर्यंत कर्ज माफी नाही झाली, तर २८ फेब्रुवारीनंतर केव्हाही आंदोलन करतील.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी रक्कम वितरणास विलंब का? सहकारमंत्र्यांनी सांगितलं कारण

Mechanized Paddy Transplantation: यंत्राने भात लागवडीकडे वाढता कल

MIDC Long March : एमआयडीसीविरोधात वर्णे ते सातारा ‘लाँग मार्च’

Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांवर सरकारची कारवाई; अनुदानाची वसुली, तुरुंगवासाचीही शक्यता?

Skill Training Centre: मराठवाड्यात सुरू होणार अत्याधुनिक कौशल्य प्रशिक्षण केंद्र

SCROLL FOR NEXT