Onion Market Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Export : कांदा निर्यातीला प्रोत्साहन द्या

कांदा निर्यातीला प्रोत्साहन द्यावे, अन्यथा प्रशासनाच्या दारात कांदे ओतून आंदोलन करणार आहोत, असा निर्णय किसान सभेने घेतला आहे.

Team Agrowon

Onion Market News Nagar : कांद्याच्या प्रमुख बाजार समित्यांमधील विक्रीदर ४५० ते ६०० रुपयांपर्यंत कोसळल्याने महाराष्ट्रभरातील कांदा उत्पादक शेतकरी (Onion Producer Farmer) हवालदिल झाले आहेत.

सरकारी यंत्रणांनी मान्य केलेला कांद्याचा उत्पादन खर्च (Onion Production Cost) ८५० ते ९०० रुपये प्रति क्विंटल आहे. मात्र राज्यात आजमितीला कांद्याला (Onion Rate) प्रतिक्विंटल केवळ ४५० रुपये ते ६०० रुपये भाव मिळत आहे.

त्यामुळे निर्यातीला प्रोत्साहन द्यावे, अन्यथा प्रशासनाच्या दारात कांदे ओतून आंदोलन करणार आहोत, असा निर्णय किसान सभेने घेतला आहे.

कांदा उत्पादक शेतकरी व किसान सभेचे पदाधिकारी यांची अकोले येथे नुकतीच बैठक झाली. अनेक विषयांवर तीत चर्चा झाली. त्या वेळी हा निर्णय घेण्यात आला.

कांद्याचा उत्पादन खर्च तर सोडाच, या दरात काढणी आणि वाहतुकीचा दरही भरून निघत नाही. राज्यातील भाजप-शिंदे सरकारने या पार्श्‍वभूमीवर तातडीने हस्तक्षेप करण्याची आवश्यकता आहे.

दुर्दैवाने सरकार व राज्यातील सत्ताधारी पक्ष सत्तेच्या साठमारीत मश्गूल आहेत. मात्र, कांदा उत्पादकांसाठी आक्रमक आंदोलन उभे करण्याचा संकल्प किसान सभेने केला आहे.

डॉ. अशोक ढवळे, जे. पी. गावित, डॉ. अजित नवले, उमेश देशमुख, संजय ठाकूर, चंद्रकांत गोरखाना, सुभाष चौधरी आदी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tomato Disease: उन्हाळ्यात टोमॅटो पिकातील विषाणूजन्य रोगांसाठी ३ सोपे उपाय

Sugarcane GPS Survey: उत्तर प्रदेशात ऊस पिकाचे जीपीएस सर्वेक्षण, शेतकऱ्यांना 'एसएमएस'द्वारे माहिती, अनेक फायदे मिळणार

Crop Insurance Delay: पीक विमा तत्काळ सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करा

World Veterinary Day: पशुवैद्यकीय सेवांमुळेच पशुधन सुरक्षित

Farmer Protest: आंबा, काजू उत्पादकांचा १५ मे रोजी ‘वर्षा’वर मोर्चा

SCROLL FOR NEXT