Soybean Procurement Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Procurement : धाराशिव जिल्ह्यात सोयाबीन खरेदीसाठी ४५ दिवसांची मुदतवाढ द्या

Soybean Market : सोयाबीन खरेदीला ४५ दिवसांची मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी आपण पणन मंत्री जयकुमार रावल यांच्याकडे केल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.

Team Agrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा

Dharashiv News : धाराशिव : सुरुवातीला आर्द्रता आणि त्यानंतर बारदान्याच्या तुटवड्यामुळे अनेक शेतकऱ्यांना हमीभाव खरेदी केंद्रांवर सोयाबीन घालता आलेले नाहीत. नोंदणीकृत शेतकऱ्यांची एकूण संख्या आणि बाजारात भाव मिळत नसल्याने हमीभाव खरेदी केंद्राकडे वाढलेला शेतकऱ्यांचा कल पाहता, अधिकाधिक सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हमीभाव योजनेचा लाभ मिळणे आवश्यक आहे.

त्यासाठी सोयाबीन खरेदीला ४५ दिवसांची मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी आपण पणन मंत्री जयकुमार रावल यांच्याकडे केल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.

जिल्हा आणि परिसरात खरीप हंगामातील नगदी पीक म्हणून सोयाबीनला बहुतांश शेतकऱ्यांची पसंती आहे. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामात ४ लाख ६२ हजार ८७२ हेक्टरवर सोयाबीनचा पेरा करण्यात आला होता. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या सोयाबीनला रास्त हमीभाव मिळावा, यासाठी जिल्ह्यात २१ हमीभाव खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. सुरुवातीला हवामानातील बदलामुळे अपेक्षित आर्द्रता नसल्याने शेतकऱ्यांना हमीभाव केंद्रावर सोयाबीन घालण्यासाठी विलंब झाला.

सोयाबीनला सध्या खुल्या बाजारपेठेत अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकरी यंदा मोठ्या संख्येने शासकीय खरेदीकडे वळले आहेत. जिल्ह्यात ३२ हजार ९ शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रांकडे नोंदणी केली आहे. त्यापैकी ५ हजार ३३८ शेतकऱ्यांच्या १ लाख ३३ हजार २२७ क्विंटल सोयाबीनची खरेदीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तर १४ हजार ५४१ शेतकऱ्यांना खरेदी केंद्रांकडून मेसेज गेलेले आहेत. जिल्ह्यातील बहुतांश सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांकडे आजही मोठ्या प्रमाणात सोयाबीन शिल्लक आहे.

मात्र सुरुवातीला आर्द्रता व त्यानंतर बारदाना तुटवडा यामुळे शेतकऱ्यांना हमीभाव खरेदी केंद्रांवर सोयाबीन घालता आले नाही. राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या नोंदणीची मुदत ३१ डिसेंबरपासून ६ जानेवारीपर्यंत वाढविली आहे. मात्र खरेदीच्या मुदतीत अद्याप वाढ करण्यात आलेली नाही. त्यामुळे मुळात ३१ डिसेंबरपर्यंत नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांचेच सोयाबीन १२ जानेवारीपर्यंत खरेदी होऊ शकणार नाही. तर मग ६ जानेवारीपर्यंत नोंदणी होणाऱ्या शेतकऱ्यांचे सोयाबीन कसे खरेदी होणार, असा प्रश्न उपस्थित करीत सोयाबीन खरेदीसाठी मुदतवाढ देण्याची मागणी केली.

बारदानासाठी पाठपुरावा सुरू

मागील आठवडाभरापासून बहुतांश खरेदी केंद्रांना बारदान्याची चणचण भासत आहे. परिणामी काही केंद्रांवरील खरेदी प्रक्रिया यामुळे ठप्प पडलेली आहे. लवकरच बारदाना उपलब्ध होईल आणि खरेदी पूर्ववत सुरू होईल त्यासाठी आपला पाठपुरावा सुरू असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Banana Crop Insurance: ‘त्या’ केळी विमाधारकांकडून खुलासे मागविणार

Banana Crop Insurance: बारड मंडळातील ३३९ केळी उत्पादकांना परतावा मंजूर

Agrowon Podcast: कांद्याचा भाव दबावातच; कापूस भाव स्थिर, मका आवक स्थिर, तूर स्थिरावली तर पपईच्या भावात उठाव

Avakali Paus: अवकाळी पावसाचा इशारा! फळबागांचे नुकसान टाळण्यासाठी करा तातडीचे व्यवस्थापन

Tapi Mega Recharge Project: तापी मेगा रिचार्ज प्रकल्पाला चालना केव्हा?

SCROLL FOR NEXT