Crop Insurance Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance : चुकीच्या नोंदीचे कारण देत शेतकरी ठरवले अपात्र

Crop Damage Compensation : गेल्या वर्षात नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात आलेल्या पावसामुळे कपाशीचे सिंदखेडराजा (जि. बुलडाणा) तालुक्यात मोठे नुकसान झाले होते.

 गोपाल हागे

Akola News : गेल्या वर्षात नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात आलेल्या पावसामुळे कपाशीचे सिंदखेडराजा (जि. बुलडाणा) तालुक्यात मोठे नुकसान झाले होते. तेव्हा शेतकऱ्यांनी दिलेल्या तक्रारी विमा कंपनीने अपात्र ठरवल्याने अडचण झाली आहे.

याबाबत या तालुक्यातील वसंतनगर येथील शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांना तक्रार देत विमा लाभ मिळवून देण्याची मागणीही केली आहे. याबाबत नुकसानग्रस्त शेतकरी बाबू फकिरा जाधव, सुग्राबाई बाबू जाधव, शिवाजी जाधव, प्रकाश जाधव, नामदेव जाधव आदी शेतकऱ्यांनी निवेदन दिले.

नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यांत झालेल्या पावसामुळे कपाशीचे तेव्हा नुकसान झाले होते. याबाबत विमा कंपनीच्या ॲपवर पीक नुकसानीबाबत तक्रार केली होती. तक्रार नोंदवत असताना ‘स्टँडिंग क्रॉप’ऐवजी ‘हार्वेस्टेड क्रॉप’ अशी नजरचुकीने नोंद झाली.

याच कारणाने आता कंपनीने अपात्र ठरवले आहे. वास्तविक त्या पावसाने कपाशीचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळेच विमा कंपनीला ॲपवर तक्रार करण्यात आली. आता अपात्र दर्शविल्याने शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपासून वंचित राहावे लागणार आहे.

पिकाचे नुकसान झाल्याने तक्रार केली होती. आता अपात्र ठरवल्याचे समजले. याबाबत लोकप्रतिनिधींसोबत न्यायासाठी संपर्क साधला तर तेही दुर्लक्ष करीत आहेत.
- शिवाजी जाधव, शेतकरी, वसंतनगर, ता. सिंदखेडराजा, जि. बुलडाणा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Beed Water Planning: बीडमध्ये पुढील दहा महिन्यांच्या पाणी, चाऱ्याचे नियोजन करा : जी. श्रीकांत

Rabi Crop Variety Selection: रब्बी पिकांसाठी वाण निवड महत्त्वाची

CJP Protest: जेलमध्ये टाकले, तरी आम्ही पुन्हा येऊ : दिपके

Poultry Processing By Products: कुक्कुट प्रक्रिया उद्योगातील उप-उत्पादनांपासून मूल्यवर्धन

Crop Damage Panchnama: शेतकऱ्यांना कागदपत्रांच्या अटीत अडकवू नका; पिकांचे सरसकट १०० टक्के पंचनामे करा, कैलास पाटील यांची मागणी

SCROLL FOR NEXT