Crop Insurance Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance : पिकविम्याच्या अग्रिमसाठी शेतकऱ्यांचे हेलपाटे

Crop Insurance Update : सहा महसूल मंडळांतील शेतकऱ्यांना पीकविमा अग्रिम खात्यावर जमा होत असली तरी रक्कम जमा न झालेल्या शेतकऱ्यांना तालुका कृषी कार्यालयाला हेलपाटे घालावे लागत आहेत.

Team Agrowon

Nilanga News : ऑगस्ट महिन्यात पडलेल्या पावसाच्या खंडामुळे सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले. सहा महसूल मंडळांतील शेतकऱ्यांना पीकविमा अग्रिम खात्यावर जमा होत असली तरी रक्कम जमा न झालेल्या शेतकऱ्यांना तालुका कृषी कार्यालयाला हेलपाटे घालावे लागत आहेत. शिवाय चार मंडळातील शेतकरी अजूनही पीकविम्यापासून वंचित आहेत.

यंदा खरिपाच्या उशिरा पेरण्या झाल्या पाऊसही सरासरीपेक्षा कमी झाला आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादनात मोठी घट झाली असून अनेक भागात सोयाबीनचा उत्पादन खर्चही निघाला नाही. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या संपूर्ण आशा पीकविम्याकडे लागल्या होत्या तालुक्यात तब्बल ४५ दिवस पावसाचा खंड पडला होता

त्यामुळे फुलोरा व फळधारणा अवस्थेत असलेल्या सोयाबीनला मोठा फटका बसला तालुक्यातील निलंगा, पानचिंचोली, कासारबालकुंदा, मदनसुरी, निटूर व भुतमुगळी या सहा महसूल मंडळातील पीकविमाधारक शेतकऱ्यांना शासनाच्या आदेशाप्रमाणे पीकविमा अग्रिम २५ टक्के रकमेचे वाटप सुरू असून ३१ डिसेंबरपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले जाणार आहेत.

तरीही खात्यावर अग्रिम जमा झाली नाही म्हणून अनेक शेतकरी चौकशीसाठी तालुका कृषी कार्यालयाला हेलपाटे घालत आहेत. सहा महसूल मंडळातील किती शेतकऱ्यांना विमा अग्रिम मिळाली किती शेतकरी शिल्लक राहिले याचा ताळमेळ अजूनही लागत नाही विमा कंपनीचा प्रतिनिधी कृषी कार्यालयात असल्याने येथे शेतकरी चौकशीसाठी हेलपाटे घालत आहेत.

तर उर्वरित औरादशहाजानी, कासारसिरसी, हलगरा व आंबुलगा- बु या चार महसूल मंडळातही कमी पाऊस झाला असताना पहिल्या टप्यामध्ये २५ टक्के अग्रिम पीकविमा रक्कम मिळणे दुरापास्त झाले आहे.

रब्बीही हातची जाणार

सध्या वातावरणातील बदलामुळे हरभरा पीक धोक्यात आले आहे. ढगाळ वातावरणामुळे दोन- अडीच महिने झाले तरी फुलोरा निर्माण होत नाही त्यामुळे रब्बी हंगामातील हरभरा पीक धोक्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rainfall Update: जुलै महिन्यात ३८ मंडलांत कमी पाऊस

Rural Development: सोसायट्या गावाच्या विकासाचे केंद्र बनाव्यात : मंत्री बाबासाहेब पाटील

Jeevamrut Initiatives: एकाच दिवसात ५०० लिटर जिवामृत निर्मितीचा उपक्रम

Crop Damage Compensation: काजू, आंबा उत्पादक नुकसान भरपाईपासून वंचित, पंचनाम्यांतील तांत्रिक अडचणी दूर करण्याची मागणी

Crop Insurance Scheme: बीडमध्ये २.३१ लाख शेतकऱ्यांचे पीकविमा संरक्षण

SCROLL FOR NEXT