Farmer Aggressive Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance : भरपाई न मिळाल्याने शेतकऱ्यांनी कृषी कार्यालयातच विमा कंपन्याच्या अधिकाऱ्यांना डांबले

Crop insurance fruit growers : फळपीक विमा न मिळाल्याने अमरावतीमधील शेतकरी आक्रमक झाले. त्यांनी पीक विमा कंपन्यांच्या प्रतिधिनींना कृषी कार्यालयात डांबून ठेवले.

Swapnil Shinde

Amaravati News : अमरावती जिल्ह्यातील फळ बागायतदार शेतकऱ्यांनी संत्रा, मोसंबी, केळी पिकासाठी विमा काढला. गतवर्षी अवकाळी पाऊस आणि खराब हवामानामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्याचे पंचनामे करून कृषी विभाग आणि पीक विमा कंपन्यांकडून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना विम्याचा लाभ देण्याचे सांगण्यात आले होते. मात्र, शेतकऱ्यांना अद्यापही भरपाई न मिळाल्याने शेतकरी आक्रमक झाले. त्यांनी अमरावती कृषी कार्यालयात विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींना डांबून ठेवले.

शासनाच्या पीक विमा योजनेमध्ये पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना २०२२-२३ मध्ये अमरावती जिल्ह्यातील शेतकरी सहभाग झाले होते. त्यांनी संत्रा, मोसंबी, केळी या पिकांसाठी फळ विमाचा हप्ता भरला होता. परंतु खराब हवामान आणि अवकाळी पावसामुळे बागाचे मोठे नुकसान झाले. त्याचा कृषी विभाग आणि विमा कंपन्यांच्यावतीने पंचनामा केला. त्यानुसार ३ हजार १५६ शेतकरी पीक विम्यासाठी पात्र झाले. परंतु विमा कंपन्यांना केंद्र आणि राज्य सरकारचा हिस्सा जमा नसल्याने भरपाई मिळत नव्हती.

गेल्या महिन्यात विमा कंपन्यांकडे शासनाचा हिस्सा दिल्यानंतर दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात भरपाईची रक्कम जमा होईल, असे सांगण्यात आले. परंतु अजूनही शेतकऱ्यांना विम्याची रक्कम मिळाली नसल्याने आज अमरावती जिल्हा कृषी अधीक्षक राहुल सातपुते यांच्या उपस्थितीत पीक विमा कंपनी प्रतिनिधी आणि शेतकरी बैठक झाली. यावेळी विमा कंपनीच्या प्रतिनिधींकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आल्याने शेतकरी आक्रमक झाले.

शेतकरी कृषी अधीक्षकांच्या दालनाचा दरवाजा बंद करून विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींना दोन तासांपेक्षा अधिक काळ डांबून ठेवले. त्यामुळे कृषी कार्यालयात एकच खळबळ उडाली. त्यानंतर पोलिसांनी आंदोलक शेतकऱ्यांना ताब्यात घेतले. यावेळी आंदोलकांच्यवतीने घोषणाबाजी करण्यात आली.

अमरावती जिल्ह्यातील ३ हजार १५६ फळ बागायतदार शेतकऱ्यांना विमा कंपन्यांकडून १० कोटी ७० लाख रुपये देय आहे. परंतु अद्याप विमा कंपन्यांनी ते दिले नाही. सुरुवातीला सरकारचा हप्ता जमा झाला नाही, असे कारण देण्यात आले आहे. आताही त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर मिळत नाही.
राहुल सातपुते, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Protest: आंबा, काजू उत्पादकांचा मोर्चा मुंबईत रोखला, राजू शेट्टी, महादेव जानकरांची पोलिसांकडून धरपकड

Agrowon Podcast: सोयाबीनमध्ये चढ उतार; कापूस टिकून, मक्याचा भाव दबावातच, बाजरी आवकेचा दबाव, तूर स्थिरावली

Illegal Water Lifting: अवैध पाणी उपसा; तलावांवरील मोटारी हटविण्याचे आदेश

Lower Terna Project: निम्न तेरणा प्रकल्पाचा कारभार वाऱ्यावर

Land Acquisition: शेतकऱ्यांच्या भूसंपादनाचा निधी तातडीने द्या : मंत्री प्रकाश आबिटकर

SCROLL FOR NEXT