Shaktipeeth Highway  Agrowon
ॲग्रो विशेष

Shaktipeeth Highway : शक्तीपीठ महामार्गप्रश्नी कोल्हापुरात शेतकरी आक्रमक; पालकमंत्री मुश्रीफांचा ताफा आडवला

Guardian Minister Hasan Mushrif : सध्या राज्यात विधानसभेची आचारसंहिता लागू झाली आहे. पुढच्या महिन्यात २० तारखेला मतदान आणि दोन दिवसानंतर निकालाची घोषणा होईल. यामुळे जिल्ह्यात वातावरण आता तापण्यास सुरूवात झाली आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. जागावाटपाबरोबरच उमेदवार निश्चित करण्यात राजकीय पक्ष आणि नेते दंग झाले आहेत. तर यंदा प्रचाराला फक्त ३० एक दिवस मिळणार असल्याने आतापासूनच नेत्यांनी आपल्या मतदार संघात दौरे सुरू केले आहेत. यादरम्यान दौऱ्यावर गेलेल्या पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना शेतकऱ्यांच्या रोषाचा सामना करावा लागला आहे. कागल तालुक्यातील एकोंडी गावात शक्तीपीठ महामार्गप्रश्नी शेतकऱ्यांनी त्यांचा ताफा अडवत गाडी समोर ठिय्या आंदोलन केले. यामुळे काही काळ गोंधळ उडाला होता.

शक्तीपीठ महामार्गप्रश्नी राज्यासह कोल्हापुरात शेतकरी संतापले आहेत. शेतकऱ्यांकडून विविध जिल्ह्यात शक्तीपीठ महामार्गला तीव्र विरोध केला आहे. आताही कोल्हापूर जिल्ह्यात यावरून विरोध सुरूच आहे. यादरम्यान शेतकऱ्यांच्या रोषाचा फटका पालकमंत्री मुश्रीफ यांना बसला आहे. कागल तालुक्यातील एकोंडी गावात शक्तीपीठ महामार्गप्रश्नावरून गावकऱ्यांनी त्यांचा ताफा अडवला. तर याबाबत शेतकऱ्यांनी प्रश्न केला. यावरूनच संतप्त शेतकऱ्यांनी मुश्रीफांच्या गाडी अडवली.

शक्तीपीठ महामार्गप्रश्नी मंत्री मुश्रीफ यांना धारेवर धरत आचारसंहितेपूर्वी शक्तीपीठ महामार्ग रद्दचा निर्णय का घेतला नाही? सवाल शेतकऱ्यांनी केला. शक्तिपीठ महामार्ग विरोधात गेल्या आठ महिन्यांपासून शेतकरी विविध मार्गाने आंदोलन करत आहेत. पण सरकारकडून महामार्ग रद्दचा निर्णय घेण्यात आलेला नाही. सरकारप्रमाणेच मुश्रीफ यांच्यासह नेत्यांनी केवळ तोंडी आश्वासने दिली. तर बाधित शेतकऱ्यांची बोळवण केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. तसेच याप्रश्नी मुश्रीफांनी शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या मागणीकडे दूर्लक्ष केल्यावरून नाराजी व्यक्त केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Massive Agricultural Crisis : बळीराजा उद्ध्वस्त! ८ लाख हेक्टरवरील पिके मातीमोल

Satara Rabi Season : सातारा जिल्ह्यात 'रब्बी'ची केवळ ५ टक्केच पेरणी पूर्ण; पाऊस गायब झाल्याने बळीराजा संकटात!

Nar-Par Girna Project : नार-पार, गिरणा नदीजोड प्रकल्पाला तीव्र विरोध; जमिनी आणि पाणी वाचवण्यासाठी शेतकरी एकवटले!

Agriculture Electricity : शेतीपंपांच्या विजेसाठी चामोर्शीत बळीराजा आक्रमक; संतप्त शेतकऱ्यांनी मुख्य रस्त्यावर केला चक्काजाम!

Hingoli Agriculture Crisis : हिंगोली जिल्ह्यात शेती वाचवा अभियान सुरू

SCROLL FOR NEXT