Farmers Blocked Highway agrowon
ॲग्रो विशेष

Farmers Blocked Highway : वाढीव पाणीपट्टी विरोधात शेतकऱ्यांनी रोखला महामार्ग, मुख्यमंत्र्यांना राजू शेट्टींचा इशारा

Irrigation Federation Maharashtra : महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनच्यावतीने वाढीव पाणीपट्टीविरोधात पुणे -बंगळूर महामार्ग रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

sandeep Shirguppe

Raju Shetti VS Eknath Shinde : राज्य सरकारने शेतीच्या पाणीपट्टीत दहापटीने दरवाढ केली असून कृषीपंपाना जलमापक यंत्र (पाणी मीटर) बसविले जाणार आहेत. हे निर्णय तातडीने मागे न घेतल्यास मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांना कृष्णेच्या पाण्याची आंघोळ घालणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी शिरोली ता. हातकंणगले येथे पुणे -बंगळूर महामार्गावरील आंदोलना दरम्यान दिला.

महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशन यांच्यावतीने सांगली, कोल्हापूर व सातारा जिल्ह्यातील वाढीव पाणीपट्टी विरोधात पुणे -बंगळूर महामार्ग रास्ता रोको आंदोलन आज (ता.२९) करण्यात आले.

दरम्यान आंदोलनस्थळी पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांनी भेट देऊन सरकारने याबाबत ६ जून रोजी बैठकीचे लेखी पत्र दिले. यानंतर रास्ता रोको आंदोलन स्थगित करून ६ जूननंतर पुढील आंदोलनाची दिशा जाहीर करण्याचे ठरले.

एकीकडे सरकारने शेतकऱ्यांवर अन्याय करणारे तुघलकी निर्णय घेऊ लागले आहे. तर दुसरीकडे शेतीमाल कवडीमोल दराने विकला जात आहे. दसपट वाढीव पाणीपट्टी करणारे सरकार एफ. आर. पी मध्ये तोडमोड करून तुकड्याने शेतकऱ्यांना ऊस बिले अदा करत आहेत.

याबाबत सरकार मुग गिळून गप्प बसले असून पाणीपट्टी मात्र एक रक्कमी वसुलीचा तगादा लावला आहे. तोट्यातील शेतीमुळे शेतकरी मेटाकुटीस आलेले आहेत. यामुळे सरकारने तातडीने याबाबत निर्णय घेऊन हे तुघलकी निर्णय मागे घेण्याचा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला. तसेच हा निर्णय मागे न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.

यावेळी श्रमिक मुक्ती दलाचे भारत पाटणकर, आमदार सतेज पाटील, आमदार अरूण लाड, मा. आमदार संजयबाबा घाटगे, इरिगेशन फेडरेशनचे विक्रांत पाटील -किणीकर यांच्यासह सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Processing Success: सोयाबीन प्रक्रियेतून महिला गटाची प्रगती

Shaktipeeth Highway Protest: शक्तिपीठ महामार्गाविरोधात सोमवारी राज्यभर आंदोलन

Smart Farming: स्मार्ट शेती : गरज, तंत्रज्ञान आणि भविष्य

Bhusar Market Closure: मार्केट यार्डातील भुसार बाजार २५ फेब्रुवारीला राहणार बंद

Sunflower Farming: कमी कालावधीच्या सूर्यफूल वाण पेरणीस पसंती

SCROLL FOR NEXT