Crop Insurance Agrowon
ॲग्रो विशेष

Agrim Pik Vima : राज्याने विमा हप्ता न भरल्यामुळे परभणीत अग्रिम विमा प्रलंबित

Crop Insurance : २०२४ च्या मध्ये पर्जन्यमानातील असाधारण तफावत, नैसर्गिक आपत्ती, पूर परिस्थितीमुळे २५ टक्क्यांपेक्षा जास्त बाधित क्षेत्र या प्रातिनिधिक सूचकाआधारे तसेच राज्य शासन व विमा कंपनी प्रतिनिधी यांच्या संयुक्त पाहणीनुसार जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी ३० सप्टेंबर २०२४ रोजी अधिसूचना काढली.

माणिक रासवे

Parbhani News : पंतप्रधान पीकविमा योजनेतील मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती (मिड-सीझन अॅडव्हर्सिटी) या जोखीमबाबी अंतर्गत परभणी जिल्ह्यात २०२४ च्या खरीप हंगामातील सोयाबीन, कपाशी, तूर पीकविमाधारक शेतकऱ्यांना संभाव्य विमा भरपाई रकमेच्या २५ टक्के मर्यादेत अग्रिम (आगाउ) विमा रक्कम अदा करण्यासाठी ३३५ कोटी ९० लाख रुपये मंजूर झाले आहेत.

परंतु अद्याप राज्य शासनाच्या हिश्शाचा प्रथम विमा हप्ता रक्कम विमा कंपनीला प्राप्त झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यावर अग्रिम विमा रक्कम जमा करण्याची प्रक्रिया लांबली आहे. २०२४ च्या मध्ये पर्जन्यमानातील असाधारण तफावत, नैसर्गिक आपत्ती, पूर परिस्थितीमुळे २५ टक्क्यांपेक्षा जास्त बाधित क्षेत्र या प्रातिनिधिक सूचकाआधारे तसेच राज्य शासन व विमा कंपनी प्रतिनिधी यांच्या संयुक्त पाहणीनुसार जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी ३० सप्टेंबर २०२४ रोजी अधिसूचना काढली.

अधिसूचना जाहीर झाल्यापासून १ महिन्याच्या आत, परंतु राज्य व केंद्र शासनाचा प्रथम विमा हप्ता प्राप्त झाल्यानंतर या तरतुदीनुसार सोयाबीन, कपाशी, तूर या पिकांकरिता सर्व विमाधारक शेतकऱ्यांच्या खात्यावर २५ टक्के अग्रिम विमा रक्कम जमा करावी, असे आदेश दिले आहेत.

त्यानुसार विमा कंपनीने ३३५ कोटी ९० लाख रुपये अग्रिम विमा मंजूर केला. त्यात सोयाबीनसाठी २६८ कोटी ५० लाख रुपये, कपाशीसाठी ५३ कोटी १८ लाख रुपये, तुरीसाठी १४ कोटी १४ लाख रुपये मिळून एकूण ३३५ कोटी ९० लाख रुपये विमा रकमेचा समावेश आहे.

२०२४ च्या खरिपात परभणी जिल्ह्यातील ३ लाख ५७ हजारांवर शेतकऱ्यांनी ७ लाख ६३ हजार ७८१ अर्ज दाखल करत ५ लाख २४ हजार २६७ हेक्टरवरील पिकांसाठी २ हजार ७७७ कोटींवर रुपयाचे विमा संरक्षण घेतले होते. त्यासाठी शेतकरी हिश्‍शाचा ७ कोटी ६५ लाख रुपये विमा हप्ता भरणा करण्यात आला.

राज्य शासनाच्या हिश्‍शाचा ४२७ कोटी १७ लाख ९७ हजार रुपये, तर केंद्र शासनाच्या हिश्‍शाचा ३५६ कोटी ९८ लाख रुपये विमा हप्ता आहे. परंतु अद्याप राज्य शासनाच्या हिश्‍शाचा विमा हप्ता प्राप्त न झाल्यामुळे विमा कंपनीने शेतकऱ्यांना अग्रिमची रक्कम अदा केलेली नाही. अग्रिम अदायगीसाठी राज्य शासनाने तत्काळ विमा हप्ता जमा करणे गरजेचे आहे, असे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

परभणी जिल्हा मध्य हंगाम प्रतिकूल स्थिती मंजूर अग्रिम विमा स्थिती (रक्कम कोटी रुपये)

तालुका...सोयाबीन...कापूस...तूर...एकूण

परभणी...५०.७७...७.०५...०.८७...५८.६९

जिंतूर...४०.११...१०.००...४.३९...५४.५१

सेलू...२३.३१...९.८९...२.०५...३५.२५

मानवत...२०.९७...५.२७...०.४३...२६.६७

पाथरी...२१.२७...७.२०...०.८३...२९.३०

सोनपेठ...२६.६३...३.२३...०.७०...३०.५६

गंगाखेड...३०.४१...३.९९...२.६१...३७.०१

पालम...२४.९५...३.२७...१.७०...२९.९२

पूर्णा...३०.१६...३.२९...०.५५...३४.००

अधिसूचना जाहीर झाल्यापासून महिनाभरात म्हणजे ऑक्टोबरमध्ये अग्रिम विमा रक्कम मिळणे अपेक्षित होते. पीकविमा प्रश्‍नी सातत्याने पाठपुरावा केला. आंदोलने केली. परंतु त्याकडे राज्य शासनाने दुर्लक्ष केले. तब्बल पाच महिने उलटले तरी शेतकऱ्यांना विमा मिळालेला नाही. त्यामुळे शेतकरी आंदोलनाच्या परत एकदा तयारीत आहेत.
- हेमचंद्र शिंदे, पीकविमा अभ्यासक, रावराजूर, ता. पालम, जि. परभणी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Electricity : शेतीपंपांच्या विजेसाठी चामोर्शीत बळीराजा आक्रमक; संतप्त शेतकऱ्यांनी मुख्य रस्त्यावर केला चक्काजाम!

Hingoli Agriculture Crisis : हिंगोली जिल्ह्यात शेती वाचवा अभियान सुरू

Farmers Protest : शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी मिळेपर्यंत हटणार नाही! भिलवडीत राजू शेट्टींचे कोरड्या कृष्णा नदीपात्रात ठिय्या आंदोलन

Banana Farmers : केळीच्या दांड्याचे वजन ठरतेय तोट्याचे; खरेदीदारांच्या मनमानीमुळे बळीराजा त्रस्त!

Drought Relief : दुष्काळी उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करा; जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांचे कडक निर्देश

SCROLL FOR NEXT