Parbhani Sowing update Agrowon
ॲग्रो विशेष

Parbhani Rain News : पेरणीसाठी शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतिक्षा

Parbhani Sowing update : परभणी व हिंगोली जिल्ह्यात मोसमी पावसाचे आगमन झाले आहे. गेल्या दोन दिवसांपासून पाऊस सुरु आहे. परंतु अजूनही सर्वदूर पेरणीयोग्य पाऊस झालेला नसल्याने जमिनीत कोरडीच आहे.

Team Agrowon

Parbhani Rain News : परभणी व हिंगोली जिल्ह्यात मोसमी पावसाचे आगमन झाले आहे. गेल्या दोन दिवसांपासून पाऊस सुरु आहे. परंतु अजूनही सर्वदूर पेरणीयोग्य पाऊस झालेला नसल्याने जमिनीत कोरडीच आहे.

पेरणीसाठी शेतकऱ्यांना दमदार पावसाची वाट पहावी लागत आहे. दरम्यान, सोमवारी (ता. २४) सकाळी आठ पर्यंतच्या २४ तासांत या दोन जिल्ह्यातील ६७ मंडलात हलका ते मध्यम पाऊस झाला.

परभणी जिल्ह्यात गेल्या २४ तासांत परभणी, जिंतूर, सेलू, मानवत, पाथरी, सोनपेठ, गंगाखेड, पालम, पूर्णा तालुक्यांतील ४१ मंडलात हलका ते मध्यम पाऊस झाला. अनेक मंडळात रविवारी (ता. २५) दुपार नंतर व रात्री हलक्या स्वरूपाचा रिमझिम पाऊस झाला.

गेल्या २४ तासांत सरासरी १.५ मिमी तर जून महिन्यात आजवर सरासरी २१.७ मिमी पाऊस झाला आहे. आजवर सरासरीत परभणी तालुक्यात २२.४ मिमी, जिंतूर तालुक्यात १६.१ मिमी, सेलू तालुक्यात ३८.७ मिमी, मानवत तालुक्यात १५.६ मिमी, पाथरी तालुक्यात १८.२ मिमी, सोनपेठ तालुक्यात ३८.७ मिमी, गंगाखेड तालुक्यात ६१.३ मिमी, पालम तालुक्यात ३२.४ मिमी, पूर्णा तालुक्यात १७.१ मिमी पाऊस झाला.

हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, कळमनुरी, वसमत, औंढा नागनाथ, सेनगाव तालुक्यातील २४ मंडलात हलका ते मध्यम पाऊस झाला. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी ३.७ मिमी, जून मध्ये आजवर सरासरी ३०.४ मिमी पाऊस झाला.

आजवरच्या सरासरीत हिंगोली तालुक्यात ३७.८ मिमी, कळमनुरी तालुक्यात ३७.८ मिमी, वसमत तालुक्यात २३.७ मिमी, औंढा नागनाथ तालुक्यात १७.९ मिमी, सेनगाव तालुक्यात ३५.९ मिमी पाऊस झाला.

मंडलनिहाय पाऊस (मिमीमध्ये)

परभणी जिल्हा- मानवत १०, पूर्णा १२.५.

हिंगोली जिल्हा आखाडा - बाळापूर ७.८, डोंगरकडा २८.८, वारंगा ७.८, आंबा २३.८, कुरुंदा २१.५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fake Agriculture Input: बनावट निविष्ठांचे जाळे राज्यांच्या सीमापार

Jantar Mantar Protest: जंतरमंतरवरील आंदोलन आणि सप्तपर्णीची अ‍ॅलर्जी

Fake Pesticide Issue: बनावट कीडनाशके : हवी सक्षम यंत्रणा

Tissue Culture Lab Scheme: उती संवर्धन प्रयोगशाळेसाठी अर्जाची संधी

Agriculture Services Reform: कृषी विभागाच्या अकरा सेवांचे डिजिटल सुसूत्रीकरण

SCROLL FOR NEXT