Crop Insurance Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance Help : शेतकऱ्यांना पीकविमा मदतीची प्रतीक्षाच

Farmers have not received any help : अग्रीम रक्कम तर सोडाच विमा कंपनीकडून कोणतीही मदत शेतकऱ्यांना मिळालेली नसल्याने रोष व्यक्त होत आहे.

Team Agrowon

Buldhana News : मागील वर्षात नोव्हेंबर महिन्यात झालेल्या मॉन्सूनोत्तर पाऊस व गारपिटीमुळे लोणार तालुका होरपळून निघाला होता. महसूल मंडळातील शेतकऱ्यांचे कापूस, हरभरा, गहू, फळबागा पूर्णपणे नष्ट झाल्या. या पिकांचा शेतकऱ्यांनी विमा उतरवला आहे. पीक नुकसानाचे सर्वेक्षण होऊन दोन महिने उलटून गेले. मात्र, प्रत्यक्षात अग्रीम रक्कम तर सोडाच विमा कंपनीकडून कोणतीही मदत शेतकऱ्यांना मिळालेली नसल्याने रोष व्यक्त होत आहे.

लोणार तालुक्यातील बहुतांश महसूल मंडळामध्ये यावर्षी काही ठिकाणी अतिवृष्टी तर काही ठिकाणी दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे उत्पादन घटले आहे. सोयाबीन काढणीच्या वेळेला आलेल्या पावसाने हाती आलेला घासही निसर्गाने हिरावून घेतला. शेतकऱ्यांनी खऱीप हंगामात पिकांचा विमा काढला असल्याने नुकसान भरपाईची अपेक्षा आहे.

विमा काढून तसेच नुकसान होऊनही विमा कंपनीकडून अंजनी खुर्द महसूल मंडळातील शेतकऱ्यांच्या हाती दमडीही पडली नाही. महसूल व कृषी विभागाकडे शेतकरी विचारणा करीत असताना संबंधित विभाग शेतकऱ्यांना विमा कंपनीकडे जाण्याचे सूचवत आहेत.

सव्वा लाख हेक्टरला फटका

पाऊस व गारपिटीमुळे तेंव्हा जिल्ह्यात तब्बल २ लाख ३४ हजार २७५ शेतकऱ्यांचे जवळपास १ लाख २८ हजार २०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. लोणार तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले. यात प्रामुख्याने शेती पिके, फळपिके, पशुधनाची मोठी हानी झाली.

या खरीप हंगामात पिकांचा विमा काढला होता. त्यानंतर शेतातील नुकसानाची ऑनलाईन तक्रार सुद्धा केली. संबंधित विमा कंपनी प्रतिनिधीने शेतात येऊन तक्रारीची दखल घेत नुकसानाची सुद्धा नोंद केली आहे. या सर्व बाबीला दोन महिने उलटून गेले. तरी मला विमा कंपनीकडून अद्यापही मदत मिळाली नाही.- अनिल मानवतकर, शेतकरी, अंजनी खुर्द, जि. बुलडाणा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT