Sugarcane Crushing Season Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane FRP : ऊस दर जाहीर करण्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा

Sugarcane Season 2024 : कारखानदारांनी उसाला प्रतिटन ३७०० रुपये भाव द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांसह विविध शेतकरी संघटनांनी केली आहे. मात्र प्रत्यक्षात निर्णय काय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Team Agrowon

Pune News : दौंड तालुक्यात चार साखर कारखाने आहेत. यापैकी तीन कारखान्यांनी ऊस गाळप हंगाम सुरू केला आहे. गाळप सुरू झालेल्या कोणत्याही कारखान्यांनी अद्याप ऊस दर जाहीर केला नसल्यामुळे शेतकऱ्यांना आता ऊस दराची प्रतीक्षा आहे. कारखानदारांनी उसाला प्रतिटन ३७०० रुपये भाव द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांसह विविध शेतकरी संघटनांनी केली आहे. मात्र प्रत्यक्षात निर्णय काय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तालुक्यात दौंड शुगर.प्रा . लि आलेगाव ता.दौंड ,एम .आर .एन.भीमा शुगर अँड पावर प्रा. लि. संचलित भीमा सहकारी साखर कारखाना लिमिटेड पाटस व श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखाना, पाटेठाण असे तीन कारखाने सुरू आहेत व अनुराज शुगर लि.यवत कारखाना बंद आहे. या कारखान्यांची ऊस गाळप चालू होऊन साधारण १५ दिवस उलटून गेले.

अद्यापही साखर कारखान्याने दर जाहीर केले नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे प्रतिटन उसाला तीन हजार सातशे रुपयांचा दर द्यावा, अशी मागणी विविध शेतकरी संघटनांकडून होत आहे साधारणतः नोव्हेंबरपासून जिल्ह्यात ऊस गाळप हंगामाला सुरुवात झाली आहे.

मात्र, कारखानदारांकडून दर जाहीर न केल्याने मुळे शेतकऱ्यांची कोंडी कायम आहे, यामुळे शेतकऱ्यांकडून ऊस दर जाहीर करण्याची मागणी होत आहे. साखर कारखान्यांनी दर अद्याप जाहीर केला नसल्यामुळे गुऱ्हाळ चालकांनी २५०० ते २६०० रुपये प्रतिटन दर केला आहे. यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांची पिळवणूक होत आहे.

कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे लक्ष

दौंड तालुक्यातील शेतकरी एम.आर.एन.भीमा शुगर अँड पावर प्रा.लि. संचलित भीमा सहकारी साखर कारखाना लिमिटेड पाटस, दौंड शुगर प्रा.लि.आलेगाव कारखान्याला व श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखाना पाटेठाण या कारखान्याला ऊस पुरवठा करीत आहेत. गाळप हंगाम सुरू होऊनही कारखान्यांकडून ऊस दर जाहीर केले गेले नाहीत त्यामुळे कोणता कारखाना किती दर देणार आहे याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

महाराष्ट्रातील बाकी साखर कारखान्यांच्या बाजारभावाचा सारांश घेऊन त्यानुसार भीमा पाटस कडूनही चांगला बाजार भाव दिला जाईल.
- नामदेव बारवकर, उपाध्यक्ष भीमा सहकारी साखर कारखाना लिमिटेड पाटस
दहा वर्षांमध्ये ज्या पटीत खते, औषधे, बियाणे, रोजंदारी यामध्ये वाढ झाली, त्या पटीमध्ये उसाचे बाजारभाव वाढले नाहीत. ज्या कारखान्यामध्ये साखर सोडून उपपदार्थ निर्मिती आहे त्या कारखान्यांनी ५००० रुपये व ज्या ठिकाणी उपपदार्थ निर्मिती केली जात नाही त्या कारखान्याने ४००० भाव द्यावा.
- भानुदास शिंदे, माजी ऊस दर नियंत्रण मंडळ सदस्य

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nanded Heatwave: नांदेडला १३ एप्रिलपासून तापमानाचा पारा ४० अंशांवर

Crop Insurance : सुधारित पिक विमा योजनेमुळे शेतकरी भरपाईपासून वंचित?

Mumbai Pune Missing Link Project: मुंबई- पुणे प्रवासाचा वेळ ३० मिनिटांनी कमी होणार, 'मिसिंग लिंक' खुला

Fertilizer Shop License Suspension: तीन कृषी केंद्रांचे परवाने रद्द, तर एकवीस निलंबित

India Rainfall Forecast: मे महिन्यात अधिक पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT