Kharif Crop Agrowon
ॲग्रो विशेष

Kharif Paisewari : पैसेवारीमधून जखमेवर चोळले मीठ

Team Agrowon

Yavatmal News : खरीप हंगाम पिकांची २०२४-२५ या वर्षासाठी नजरअंदाज पैसेवारी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी जाहीर केली. जिल्ह्यातील २०४६ गावांची पैसेवारी ६० दाखविण्यात आली. प्रशासनाच्या लेखी पीक परिस्थिती उत्तम असल्याचे नजरअंदाजमधून दाखविण्यात आल्याने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यात आल्याचा आरोप होत आहे.

जुलै, ऑगस्ट तसेच सप्टेंबर महिन्यांत झालेल्या अतिवृष्टीचा अडीच लाखांपेक्षा जास्त हेक्टर क्षेत्राला फटका बसला आहे. नदी-नाल्यांना आलेल्या पुरामुळे शेती खरडून गेली. जिल्हा प्रशासनाने पंचनामा करून नुकसानीच्या अहवालासह मदतीसाठी लागणाऱ्या निधीचा प्रस्ताव पाठविला.

शेतकऱ्यांच्या पदरात अजूनही मदत पडली नाही. सोयाबीन पिकावर येलो मोझॅक, चक्रीभुंगासह कीड, रोगाने आक्रमण केले आहे. कापूस पिकाची स्थितीही चांगली नाही. लागवड खर्च निघणार नसल्याची ओरड शेतकऱ्यांकडून केली जात आहे. शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी हेक्टरी एक लाखाच्या मदतीची मागणी केली जात आहे.

अशातच जिल्हा प्रशासनाने जिल्ह्याची तालुकानिहाय खरीप पिकांची नजरअंदाज पैसेवारी जाहीर केली. त्यात शेतकऱ्यांची पुरती निराशा करण्यात आली आहे. जिल्ह्यात एकूण दोन हजार १५९ गावे आहेत. त्यात पीक लागवडीयोग्य गावांची संख्या दोन हजार ४६ आहे. जिल्ह्यात पन्नासपेक्षा कमी पैसेवारी एकाही गावात निघाली नाही.

केवळ यवतमाळ तसेच पुसद तालुक्याची ५४ नजर अंदाज पैसेवारी दाखविण्यात आली आहे. सहा तालुक्यांची पैसेवारी ६०, दोन तालुक्याची पैसेवारी ५८, एका तालुक्याची ६८, एका तालुक्याची ५९ तर तर चार तालुक्यांची अनुक्रमे ५७, ६२, ६३ व ६४ पैसेवारी दाखविण्यात आली आहे.

तालुकानिहाय आकडेवारी

तालुका गावांची संख्या पैसेवारी

यवतमाळ १३५ ५४

कळंब १४१ ६०

बाभूळगाव १३३ ५८

आर्णी १०६ ६०

दारव्हा १४६ ५८

दिग्रस ८१ ६८

नेर १२१ ६०

पुसद १८५ ५४

उमरखेड १३६ ५९

महागाव ११३ ५७

केळापूर १३० ६०

घाटंजी १०७ ६२

राळेगाव १३२ ६०

वणी १५५ ६३

मारेगाव १०८ ६४

झरीजामणी ११७ ६०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Animal Vaccination : पशुसंवर्धन विभागामार्फत रेबीज रोगप्रतिबंधात्मक लसीकरण

Farmer Incentive Scheme : कर्जमुक्ती प्रोत्‍साहन योजनेचा ४२४ शेतकऱ्यांना लाभ

Paddy Farming : चांगल्या पावसामुळे भातशेती बहरली

Solar Pump Scheme : मागेल त्याला सौर कृषिपंपांचा ५० हजार शेतकऱ्यांना लाभ

Crop Insurance : विमा भरपाईपोटी २७.७३ कोटींचा लाभ

SCROLL FOR NEXT