Cotton Crop Agrowon
ॲग्रो विशेष

Labor Shortage : कापूस वेचणीला मजूर मिळेनात; शेतकरी त्रस्त

Cotton Picking : कापूस वेचणीला आलाय, पण मजूर मिळेनात. जे मजूर आहेत ते वाढीव वेचणी दर मागत असल्याने अहिल्यानगर जिल्ह्यात कापूस उत्पादक त्रस्त झाले आहेत.

Team Agrowon

Ahilynagar News : कापूस वेचणीला आलाय, पण मजूर मिळेनात. जे मजूर आहेत ते वाढीव वेचणी दर मागत असल्याने अहिल्यानगर जिल्ह्यात कापूस उत्पादक त्रस्त झाले आहेत. वेचणीला यंदा बारा ते चौदा रुपये दर द्यावा लागत असल्याची स्थिती आहे. कापसाचा दर मात्र वरचेवर खालीच येत आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यात यंदा दीड लाख हेक्टरच्या जवळपास कापसाचे क्षेत्र आहे. प्रामुख्याने शेवगाव, पाथर्डी, नेवासा, राहुरी, कर्जत, जामखेड आदी भागांत कापसाचे क्षेत्र अधिक आहे. सध्या शेतकरी कापूस वेचणीत व्यग्र आहेत. त्यात दिवाळी, पाडवा, भाऊबीज सणाची धामधूम होती. त्यामुळे शेत मजुरांचा तुटवडा निर्माण झाला आहे.

शेतमजुरांकडून काम करण्याचे दर वाढवण्याची मागणी करत आहेत. शेतमजुरांचा तुटवडा निर्माण झाल्याने वेळेवर मजूर मिळावेत, म्हणून शेतकरी कापूस वेचणीसाठी बारा ते चौदा रुपयापर्यंत मजुरी देण्यास देखील तयार होत आहेत.

या हंगामाच्या सुरुवातीला समाधानकारक पाऊस झाल्याने खरिपातील सर्वच पिके जोमात आली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी अधिकचे उत्पन्न मिळावे, म्हणून पिकांची माशागत व रासायनिक खते औषध यावर मोठा खर्च केला. मात्र, त्यानंतर सतत अवेळी झालेल्या अतिवृष्टीने परिसरातील कपाशी पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला.

कापसात उन्हामुळे घट होऊ नये, म्हणून शेतकरी शेतमजुरांच्या दारी हेलपाटे मारीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. अनेक गावांत सर्वांच्या हाताला काम मिळत नसल्यामुळे काही मजूर परगावी जाऊन काम करीत आहेत.

यात वाहनचालकाकडे १५ ते २० मजुरांचा ताफा असतो. तो चालक शेतकऱ्यांकडून आधीचे पैसे घेऊन नेहमी काम करणाऱ्या मजुरांना घेऊन जातो. त्यात त्याच्या वाहनाचेही भाडे द्यावे लागत आहे. त्यातच विधानसभा निवडणुकीची धामधूम असून नेत्यांच्या प्रचारात कार्यकर्ते गुंतल्याचाही परिणाम कापूस वेचणीवर होताना दिसत आहे.

गेल्या आठवड्यापासून मजुरांचा शोध घेतोय. शेतात कपाशीची लागवड केली आहे. त्यासाठी मोठा खर्च केला. मात्र, आता कापूस वेचणीसाठी आठवड्यापासून मजुराच्या घरी खेटे मारत आहे. अद्याप मजूर होकार देत नाहीत. मजुरांअभावी अद्याप कापूस शेतातच झाडावर तसाच आहे.
- संजय राऊत, प्रगतिशील शेतकरी, ढोरसडे, ता. शेवगाव

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Garlic Rate : लसणाची आवक घटल्याने दर तेजीतच

Forest Fire : वणवे नियंत्रणासाठी जनजागृती करण्याची गरज

Sugarcane Labor Migration : निवडणूक संपताच ऊसतोड मजुरांचे स्थलांतर

Sugarcane FRP : मंडलिक साखर कारखाना इतरांच्या बरोबरीने दर देणार

Milk Rate : देशातील दूध उत्पादनात ४ टक्के वाढ; केंद्रीय मंत्र्यांची माहिती

SCROLL FOR NEXT