Soybean Market Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Market Rate : शेती सरकारला लिहून द्यायची वेळ

Soybean Price : शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे दर कोसळले असल्याची भावना शेतकरी बोलून दाखवीत आहेत.

Team Agrowon

Dharashiv News : शेतकऱ्यांचे सोयाबीन बाजारात येण्यास सुरुवात होताच, दर कोसळले आहेत. त्यामुळे ‘आमची शेती सरकारला लिहून देण्याची वेळ आली आहे’, अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.

शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे दर कोसळले असल्याची भावना शेतकरी बोलून दाखवीत आहेत. एकीकडे अपुऱ्या पावसाने उत्पादनात घट अन् त्यात पुन्हा दर कोसळत असल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे.

जिल्ह्यात यंदा सोयाबीनचा हंगाम बिघडला आहे. पावसाने काही प्रमाणात ओढ दिली होती. त्यामुळे उत्पादनात मोठी घट येण्याचे संकेत आहेत. सध्या जिल्ह्यातील सोयाबीन हंगाम काढणीच्या अवस्थेत आहे.

दर कोसळले

गेल्या महिन्याभरात सोयाबीनचे दर प्रतिक्विंटल पाच हजाराच्या पुढे होते. तर सध्या चार हजार ७०० रुपयांच्याही खाली आले आहेत. विशेष म्हणजे पाच हजार २०० रुपयांवर असलेले सोयाबीन चार हजार ७०० रुपयांवर येऊन ठेपले आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही निघणे अवघड होऊन बसले आहे. सध्या शेतकऱ्यांचे सोयाबीन बाजारात येत आहे. त्याच वेळेला दर कोसळल्याने शेतकरी वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

सरकारला आता सगळ शेत लिहून देण्याची वेळ आली आहे. आमच शेत सरकारजमा करातोत. त्याशिवाय पर्याय नाही. सोयाबीन निघण्यापूर्वीच अशी स्थिती आहे. सोयाबीन काढल्यावर तर यापेक्षा भाव कमी होतील. शेतातील मजुरी वाढली अन भाव कमी झालेत.
- किशोर नकाते, शेतकरी, येडशी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Germination Complaints: सोयाबीन उगवण तक्रारी आठ हजारांवर

Youth Protest: तरुणांच्या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा; सरकार चर्चेसाठी तयार, ‘सीजेपी’च्या अटी कायम

Rahul Gandhi: विद्यार्थ्यांवरील हल्ल्याची चौकशी करा : राहुल गांधी

Farm Loan Waiver List: मुहूर्ताची यादी ५३३ शेतकऱ्यांची !

Monsoon Rain Forecast: पुण्याच्या घाटमाथ्यावर ‘रेड अलर्ट’ कायम

SCROLL FOR NEXT