Rahul Gandhi On Crop Insurance  Rahul Gandhi Facebook Page
ॲग्रो विशेष

Crop Insurance: विम्या कंपन्याच्या गलथान कारभाराचा शेतकऱ्यांना फटका : राहुल गांधी

शेतकऱ्यांच्या समस्याबाबत बोलत असताना राहुल गांधी यांनी पीकविमा आणि कर्जमाफीबाबतच्या केंद्र सरकारच्या उदासीनतेकडे लक्ष वेधले.

Team Agrowon

"पंतप्रधान पीक विमा योजनेत (PM Crop Insurance) प्रीमियम भरूनही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई (Crop Damage) मिळत नाही. उलट शेतकऱ्यांचे आणि सरकारचे पैसे दोन-तीन मोठ्या उद्योगपतींच्या खिशात जातात. शेतकरी मात्र मदतीपासून वंचित राहतात," अशी खंत कॉँग्रेसचे नेते खा. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी 8 नोव्हेंबर रोजी सभेत व्यक्त केली.

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यात पोचली. यात्रेदरम्यान तरुण, शेतकरी आणि लहान उद्योजक यांच्याशी गांधी यांनी संवाद साधला. शेतकऱ्यांच्या समस्याबाबत बोलत असताना राहुल गांधी यांनी पीकविमा आणि कर्जमाफीबाबतच्या केंद्र सरकारच्या उदासीनतेकडे लक्ष वेधले.

यावेळी राहुल गांधी म्हणाले, "पावसासारख्या आपत्तीत शेतकऱ्याचे पीक वाया जाते. मात्र विमा कंपन्या नुकसानीची दखल घेत नाहीत. त्यामुळे शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहतात. पीक नुकसानीचा पंचनामा करायला विम्या कंपन्या शेतापर्यंत जात नाहीत. शेतकऱ्यांना त्यांचा संपर्क क्रमांक मिळत नाही, ना त्यांच्या ऑफिसचा पत्ता मिळतो. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाईही मिळत नाही."

"देशातील मोठ्या उद्योगपतींना दोन मिनिटांत कर्जमाफी मिळते, मग शेतकऱ्यांना का मिळत नाही ? शेतकऱ्यांनी अशी काय चूक केली की, शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळत नाही? " असा प्रश्नही राहुल गांधी यांनी सभेत उपस्थित केला.

भारत जोडो यात्रा 7 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी नांदेडमधील देगलूरला पोचली. त्यानंतर काल 8 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी राहुल गांधी यांनी सभा घेतली. शेतकऱ्यांशी संवाद साधला तरी त्यांचे प्रश्न कळतात, त्यासाठी नोकरशाहची गरज नसते. मात्र सरकार उद्योगपतींचे खिसे भरण्यात दंग आहे, असेही ते म्हणाले.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारचे लक्ष नसल्याची खंत गांधी यांनी व्यक्त केली. शेतकऱ्यांशी संवाद साधला तर त्यांचे प्रश्न समजतील, असे ते म्हणाले. भारत जोडो यात्रेत शेतकऱ्यांच्या व्यथा लक्षात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

First T2T Genome of Pigeonpea : देशातील पहिला 'टी2टी' जीनोम विकसित; तूर उत्पादन वाढीसाठी होणार फायदा

Sugarcane Crop Damage: अतिवृष्टिबाधित लोळलेल्या उसाचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना

Artificial Groundwater Recharge: कृत्रिम भूजल पुनर्भरणाचे तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT