Dr. Bhagwat Karad Agrowon
ॲग्रो विशेष

Farmers Training Center : शेतकरी प्रशिक्षण केंद्र सुविधांनी युक्त व्हावे

Dr. Bhagwat Karad : वनामकृवीचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोखले यांनी कृषी विद्यापीठाच्या शिक्षण विस्तार व संशोधन कार्याविषयी माहिती दिली.

Team Agrowon

Chhatarpati SambhajiNagar News : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ अंतर्गत स्थानिक कृषी तंत्र विद्यालयाच्या प्रक्षेत्रावर होत असलेले मराठवाडा शेतकरी प्रशिक्षण केंद्र आधुनिक सोयी सुविधांनी सुसज्ज असे व्हावे, अशी अपेक्षा केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी व्यक्त केली.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ अंतर्गत स्थानिक कृषी तंत्र विद्यालयाच्या प्रक्षेत्रावर होत असलेले मराठवाडा शेतकरी प्रशिक्षण केंद्र आधुनिक सोयी सुविधांनी सुसज्ज असे व्हावे, अशी अपेक्षा केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी व्यक्त केली.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ व पंजाब नॅशनल बँक यांच्या सहयोगातून निर्माण होणाऱ्या मराठवाडा शेतकरी प्रशिक्षण केंद्राचे भूमिपूजन शनिवारी (ता. १६) डॉ. कराड यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमाला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्र मणी, पंजाब नॅशनल बँकेचे कार्यकारी संचालक विभू प्रसाद महापात्रा, पंजाब नॅशनल बँकेचे मुख्य महाप्रबंधक फिरोज हसनैन, पंजाब नॅशनल बँकेचे नाशिक मंडळ प्रमुख नवीन बुंदेला, उपायुक्त अमित मुंडे, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. बी. एन. गोखले उपस्थित होते.

वनामकृवीचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोखले यांनी कृषी विद्यापीठाच्या शिक्षण विस्तार व संशोधन कार्याविषयी माहिती दिली. कुलगुरू डॉ. इंद्र मणी म्हणाले, की वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ शेतकरी केंद्रबिंदू मानून शेती विस्तार व विकासाच्या दृष्टीने शिक्षण, संशोधन व विस्ताराचे कार्य करते आहे.

महिन्यातून एकदा शास्त्रज्ञ व त्यांचे अधिनस्त लोक थेट शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन दिवस घालवण्याचा उपक्रम आणला. मराठवाड्यातील शेती आव्हानात्मक आहे. त्या आव्हानांची सोडवणूक करण्याचा प्रयत्न विद्यापीठाच्या माध्यमातून सुरू आहे.

श्री. महापात्रा म्हणाले, की फार्मर्स वेल्फेअरच्या नावाखाली पंजाब नॅशनल बँक विविध उपक्रम राबविले. चंद्रपूरनंतर दुसरे शेतकरी प्रशिक्षण केंद्र मराठवाड्याच्या मातीत उभे राहते आहे. अर्थ राज्यमंत्री डॉ. कराड म्हणाले, की शेतकरी प्रशिक्षण केंद्र होण्यासाठी आपण समन्वय साधण्याचे काम केले. जवळपास १५ करोड रुपये खर्चून या केंद्रातून आवश्यक त्या सर्व पायाभूत सुविधा निर्माण केल्या जातील.

केवळ प्रशिक्षण देण्यापुरते मर्यादित न राहता आवश्यक संशोधनही या केंद्रातून केले जावे. केंद्र राष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळविणारे कसे ठरेल याची आखणी विद्यापीठाने आणि पंजाब बँकेने करावी. त्यासाठी निधीची कमतरता पडणार नाही. विद्यापीठाने प्रत्येक गावात ड्रोन-तंत्रज्ञान विस्तारून ‘ड्रोन-दीदी’ तयार कराव्या. कार्यक्रमाचे आभार पंजाब नॅशनल बँकेचे प्रवीणचंद्र ठाकूर यांनी मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Warehouse Receipt: पूर्व युरोप, मध्य आशिया खंडातील गोदाम पावती वित्तपुरवठा

Agriculture Development: दिशा कोरडवाहू शेती विकासाची!

Fake Agri Inputs: निविष्ठांवर सरकारचे नियंत्रण किती?

Whatsapp Chatbot: महसूल विभागाच्या सेवांसाठी देणार ‘व्हॉट्सॲप चॅटबॉट’

Eknath Shinde: कमी पटसंख्येच्या शाळा बंद करणार नाही

SCROLL FOR NEXT