Farmer protest Delhi Agrowon
ॲग्रो विशेष

Farmer protest Delhi: कुस्तीपटूंच्या आंदोलनाला किसान सभेचा पाठिंबा; शेतकऱ्यांनी बॅरीकेडस तोडत केली आगेकूच

दिल्लीतील जंतरमंतरवर सुरू असलेल्या कुस्तीपटूच्या आंदोलनला किसान सभेने पाठिंबा जाहीर केल्यानंतर कुस्तीपटू व शेतकरी आक्रमक झाले.

Team Agrowon

Farmer Protest: दिल्लीतील जंतरमंतरवर सुरू असलेल्या कुस्तीपटूच्या आंदोलनला किसान सभेने पाठिंबा जाहीर केल्यानंतर कुस्तीपटू व शेतकरी आक्रमक झाले. कुस्तीपटू आणि शेतकऱ्यांनी आंदोलन तीव्र करत बॅरीकेडस तोडत आक्रमक पवित्रा घेतला. कुस्तीपटू आणि शेतकऱ्यांच्या आक्रमक भूमिकेनंतर आंदोलक आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की झाली. परिस्थिती चिघळू नये म्हणून पोलिस फौजफाटा वाढवण्यात आला आहे.

किसान सभेचे काही शेतकरी कुस्तीपटूच्या आंदोलनात सहभागी झाले आहेत. दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर मागच्या दोन आठवड्यापासून कुस्तीपटूचं रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे (WFI) प्रमुख आणि भाजपा खासदार ब्रिजभूषण यांच्या अटकेच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला किसान सभेच्या वतीने पाठींबा देण्यात आला. बजरंग पुनिया, साक्षी मलिक यांच्यासह कुस्तीपटूंनी आंदोलन पुकारले आहे.

ब्रिजभूषण यांच्यावर महिला कुस्तीपटूनी लैंगिक छळ केल्याचा आरोप करत अटकेची मागणी केली आहे. ब्रिजभूषण यांच्या अटकेच्या मागणीसाठी कुस्तीपटू दिल्लीच्या जंतरमंतरवर मागील दोन आठवड्यापासून आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला विविध राजकीय पक्ष आणि संघटनांनी पाठींबा दिला आहे.

हरियाणातील खाप पंचायतीने काही दिवसांपूर्वीच ब्रिजभूषण यांची तातडीने अटक करावी, अशी मागणी केली होती. तसेच किसान सभेच्या वतीनेही आंदोलनात सहभागी होण्याचा इशारा देण्यात आला होता. संयुक्त किसान मोर्च्याने देखील महिला कुस्तीपटूच्या आंदोलनाला पाठिंबा देत ब्रिजभूषण यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.

दरम्यान, २०२० ला दिल्लीमध्ये केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांनी अभूतपूर्व आंदोलन पुकारले होते. ते आंदोलन एक वर्षभर चालले. शेवटी केंद्र सरकारला शेतकऱ्यांच्या आंदोलनासमोर गुडगे टेकावे लागले होते. कुस्तीपटूच्या आंदोलनात सहभागी झालेली शेतकरी आक्रमक झाले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Women Farmers: आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षानिमित्त अकोल्यात महिला शेतकऱ्यांसाठी विशेष उपक्रम

Soybean Fodder Seized: कारंजा तालुक्यात २६० टन सोयाबीन कुटार जप्त; १० कारखान्यांना नोटिसा

Orange Orchards Crisis: पाण्याअभावी संत्रा बागा संकटात; वाशीममधील शेतकऱ्यांची चिंता वाढली

Mango Variety Research: नवसारी कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर महाराष्ट्रातील शिष्टमंडळाकडून पाहणी

Agricultural Labour Protest: दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ५ नोव्हेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत पिठलं-भाकरी आंदोलन

SCROLL FOR NEXT