Ravikant Tupkar Agrowon
ॲग्रो विशेष

Ravikant Tupkar : ...सरकारला जड जाईल; रविकांत तुपकरांचा सरकारला पुन्हा इशारा

Aslam Abdul Shanedivan

Pune News : सध्या राज्यात विधानसभा निवडणूकांच्या रणधुमाळीला सुरूवात झाली आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी कंबर कसली असून राज्यभर दौरे केले जात आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप पहायला मिळत असतानाच शेतकरी नेते रविकांत तुपकर शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून आक्रमक झाले आहेत. तुपकर यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारला इशारा दिला असून राज्यव्यापी आंदोलन उभारू असे म्हटले आहे. 

राज्यातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेकऱ्यांच्या प्रश्नासह सोयाबीन आणि कापसाच्या दरवाढीवरून तुपकर यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. तर शेतकऱ्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थान असणाऱ्या वर्षावर धडक देऊन शेतकरी कशी आत्महत्या करतो. याचे प्रत्याक्षिक दाखवू असा इशारा दिला होता. त्यावरून बुलढाणा पोलिसांनी तुपकरांना नोटीस बजावली होती. तर आंदोलनाच्या आधी त्यांनी तुपकरांना अटक करण्यात आली होती.

तुपकर यांनी, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी आणि शेतकऱ्यांना पीक विमा देण्याची मागणी मुंबईच्या आंदोलनामध्ये याआधीच केली होती. तर गेल्या दोन ते तीन वर्ष पडलेल्या सोयाबीन आणि कापसाच्या दरावरून केंद्र सरकारशी चर्चा करून आयात आणि निर्यातीबाबत राज्य सरकारने धोरण ठरवावे, अशी मागणी केली होती. मात्र, राज्य सरकारने आमच्या मागणी आणि आंदोलन दडपले. मला आटक केली. पण आमच्या काही शेतकरी कार्यकर्त्यांनी गिरगाव चौपाटीवर आंदोलन असे तुपकरांनी म्हटले आहे. 

तर शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसह सोयाबीन आणि कापसाच्या दराबाबत दोन ते चार दिवसांत निर्णय घ्या. अन्यथा येणाऱ्या काळात कर्जमुक्ती, पीक विमा, सोयाबीन आणि कापूस दरवाढीसह आदी शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी राज्यव्यापी आंदोलन केलं जाईल. जे न भूतो न भविष्यति असे असेल. ज्यामुळे सत्ताधारी नेत्यांना राज्यात फिरणं देखील मुश्किल होईल. तर आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासह राज्यातील मुजोर सत्ताधारी सरकारला झुकवण्यासाठी शेतकऱ्यांनी पक्ष, जात, धर्म बाजूला ठेवून एकत्र यावे. जर आपण जाती-साठी एकत्र येत असू तर मग मातीसाठी देखील एकत्र आलं पाहिजे, अस आवाहन रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांना केलं आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Palm Oil Prices : जागतिक बाजारात पामतेलाचे भाव वाढलेले; मलेशियाला होतोय फायदा

Soybean Cotton Madat : पहिल्या टप्प्यात ४६ लाख शेतकऱ्यांचं सोयाबीन, कापूस अनुदान जमा होण्याची शक्यता

Soybean Subsidy : सोयाबीन अनुदानासाठी आधार संमती पत्र भरून द्या; कृषी सहाय्यकांचं शेतकऱ्यांना आवाहन

Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने कायदा, सुव्यवस्थेचा आढावा

Groundnut Harvesting : बोरपाडळे परिसरात भुईमूग काढणी सुरू

SCROLL FOR NEXT