Millet Year 2023 Agrowon
ॲग्रो विशेष

Millet Year 2023 : लासोणा येथे शेतकरी जागरूकता कार्यक्रम

कार्यक्रमामध्ये मार्गदर्शन करताना डॉ. कैलास डाखोरे यांनी तृणधान्याचे महत्त्व व तृणधान्याच्या उत्पादन वाढीसाठी पंचसूत्री याबद्दल मार्गदर्शन केले.

Team Agrowon

Latur Agriculture News : ग्रामीण कृषी मौसम सेवा, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ (VNMKV, Parbhani), परभणी, यांच्यावतीने लासोणा (ता. देवणी) येथे नुकतेच ‘‘आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष -२०२३ (Millet Year) निमित्ताने शेतकऱ्यांसाठी कृषी हवामाना सल्ला पत्रिका व पौष्टिक तृणधान्य’’ या विषयावर शेतकरी जनजागृती (Farmer Awareness Programe) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमासाठी प्रमुख पाहूणे म्हणून वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ मधील ग्रामीण कृषी मौसम सेवा मुख्य प्रकल्प समन्वयक डॉ. के. के. डाखोरे. कार्यक्रमाचे, अध्यक्ष सरपंच धनराज मठपती, तर यावेळी उपसरपंच अंकुश माने, कृषी सहाय्यक दयानंद कदम, ग्रामसेवक आनंद कुटे, तलाठी कुक्कर गावातील प्रगतशील शेतकरी व्यंकट लादे, मंगेश माने, शंकर माने, संशोधन सहयोगी प्रमोद शिंदे, दत्ता बोबडे, यादव कदम, वरिष्ठ संशोधन फेलो (फसल), कार्यक्रमाचे आयोजक रामकृष्ण माने तसेच गावातील शेतकरी उपस्थित होते.

कार्यक्रमामध्ये मार्गदर्शन करताना डॉ. कैलास डाखोरे यांनी तृणधान्याचे महत्त्व व तृणधान्याच्या उत्पादन वाढीसाठी पंचसूत्री याबद्दल मार्गदर्शन केले. तसेच त्यांनी विद्यापीठाद्वारे प्रसारित केलेल्या विविध वाणांच्या वैशिष्ठयाबद्दल सांगितले.

तसेच हवामान अंदाजाबद्दल माहिती मिळविण्याचे स्रोत तसेच कृषी हवामान सल्ला पत्रिका तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कमी कालावधीच्या, मध्यम कालावधीच्या व दीर्घ कालावधीच्या हवामान अंदाजाबद्दल मार्गदर्शन केले.

त्यांनी कृषी हवामान सल्ला पत्रिका तयार करण्यासाठी तालुका निहाय व जिल्हा निहाय उपग्रहाच्या छायाचित्रांचा उदाहरणार्थ बाष्पोत्सर्जन, जमिनीत ओलावा, एनडीव्हीआय याचा वापर कसा केला जातो याची माहिती दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Monsoon Rain: मराठवाड्यात पावसाचा जोर कमीच; पूर्व विदर्भ आणि कोकणात पुढील ४ दिवस जोरदार पावसाचा अंदाज

Agrowon Podcast: गव्हाचे भाव स्थिरावले; डाळिंब तेजीत, मुग दबावात, केळीच्या दरात वाढ, उडदाचे भाव स्थिर

ZP School Admission : बोराखेडी जिल्हा परिषद शाळेत प्रवेश ‘ॲडमिशन फुल्ल’

Tree Plantation : जैवविविधता जपण्यासाठी वृक्षारोपण गरजेचे

Farmers Welfare: बच्चू कडू यांच्या मागण्यांना सरकारचा सकारात्मक प्रतिसाद; शेतकरी,मजुरांसाठी आश्वासने

SCROLL FOR NEXT