Agricultural Labor Union March Agrowon
ॲग्रो विशेष

Agricultural Labor Union March : शेतमजूर युनियनतर्फे तहसीलवर मोर्चा

Agricultural Labor Union : शेतकरी, विविध शासकीय योजना, रोजगारासह विविध मागण्यांसंदर्भात महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन (लालबावटा)तर्फे तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

Team Agrowon

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar News : नंदुरबार : शेतकरी, विविध शासकीय योजना, रोजगारासह विविध मागण्यांसंदर्भात महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन (लालबावटा)तर्फे तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

येथील कोरीट नाका परिसरातून गिरीविहारमार्गे तहसील कार्यालय येथे राज्य शेतमजूर युनियन लालबावटामार्फत विविध मागण्यांसंदर्भात मोर्चा काढण्यात आला. या वेळी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. निवेदनावर राज्य उपाध्यक्ष नथू साळवे, सुनील गायकवाड, सोनू न्हावे, अनिल शिरसाट, अनिल ठाकरे, रुबाबसिंग ठाकरे, सुदाम ठाकरे यांच्या सह्या आहेत.

निवेदनातील मागण्या अशा ः नंदुरबार तालुक्यात शेतीचे कामे संपलेली आहेत. मजुरांना रोजगार द्यावा, भूमिहीन -शेतमजूर, बेघर लोकांना शासनाच्या पंतप्रधान आवास योजना, रमाई आवास योजना व शबरी आवास योजनेमार्फत घरकुल मंजूर होत आहेत व होणार आहेत.

शासनाच्या नियमानुसार एक लाख २० हजार रुपये मंजूर होतात; परंतु महागाईच्या निर्देशाप्रमाणे वाळू, विटा, सिमेंटचे दर वाढलेले असल्याने घरकुल पूर्ण बांधले जात नाही म्हणून घरकुलांची रक्कम केरळ राज्याप्रमाणे प्रत्येकी सात लाख रुपये मंजूर करावे, घरासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, भूमिहीन शेतमजूर, वृद्ध, अपंग, विधवा, परितक्त्या यांना वार्षिक २१ हजारांचा उत्पन्नाचा दाखला सोबत जोडावा लागतो; परंतु तलाठी हे २१ हजारांच्या उत्पन्नाच्या दाखल्यावर शिफारस न देता ४० ते ५० हजारांचे उत्पन्नाचे दाखल देत आहेत म्हणून लाभार्थींना योजनेचा लाभ होत नाही व योजनेपासून वंचित राहत आहेत.

शासनाने लाडक्या बहिणींना अडीच लाखाचे वार्षिक उत्पन्नाची सवलत दिली आहे. तशीच सवलत संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थींना अडीच लाख उत्पन्नाचे दाखले देण्यात यावे. तालुक्यात मनरेगामार्फत नाला बडिंग, शेततळे रस्ते, लोकांना रोजगार द्यावा या प्रमुख मागण्यांसह इतर अनेक मागण्यांचा समावेश आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT