Illegal Seized  Agrowon
ॲग्रो विशेष

Illegal Seed Seized : अमरावतीत २५ लाखांचा अनधिकृत बियाणे साठा जप्त

Fake HTBT Seed : कृषी विभागाच्या पथकाने रविवारी (ता. १) अहमदाबादवरून नागपूरला जाणाऱ्या एका खासगी बसची तपासणी केली असता त्यामध्ये तब्बल ५० पोती अनधिकृत बियाण्यांचा साठा मिळून आला.

Team Agrowon

Amaravati News : गुजरात हेच देशातील अनधिकृत बियाणे व्यवहाराचे केंद्र असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. कृषी विभागाच्या पथकाने रविवारी (ता. १) अहमदाबादवरून नागपूरला जाणाऱ्या एका खासगी बसची तपासणी केली असता त्यामध्ये तब्बल ५० पोती अनधिकृत बियाण्यांचा साठा मिळून आला. जप्त करण्यात आलेल्या या बियाण्यांची किंमत २५ लाख रुपयांच्या घरात असल्याची माहिती विभागीय कृषी सहसंचालक प्रमोद लहाळे यांनी दिली.

हंगाम सुरू होताच एचटीबिटी (हर्बीसाईड टॉलरंट बिटी) बियाण्यांच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या माथी बोगस बियाणे मारले जाते. हंगामाअखेरीस या कापूस बियाण्यांना फूल आणि बोंडधारणा न झाल्यास शेतकऱ्यांची फसगत होते. मात्र हे बियाणे अनधिकृत असल्याने या विरोधात शेतकऱ्यांना कोठेच दाद मागता येत नाही.

एकदा फसगत झालेले शेतकरी दुसऱ्यांदा याची लागवड करीत नसले तरी या क्षेत्रातील महाभाग दरवर्षी नव्या ग्राहकांचा शोध घेत त्यांना बियाणे विक्री करीत आपले दुकान सुरू ठेवतात. आतापर्यंत अमरावती विभागात ४० ते ४५ लाख रुपयांचा बियाणे साठा विविध कारवायांमध्ये जप्त करण्यात आला आहे.

त्यानंतर रविवारी (ता. १) गोपनीय माहितीवरून कृषी सहसंचालक प्रमोद लहाळे यांच्या मार्गदर्शनात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते, वरिष्ठ लिपीक श्रीकांत नागे, प्रदीप वानखडे यांनी केलेल्या कारवाईत ५० पोते अनधिकृत बियाण्यांचा साठा जप्त करण्यात आला. प्रत्येक पोत्यात ५० याप्रमाणे २५०० पाकिटे मिळून आली. जप्त बियाण्यांची किंमत २५ लाख रुपये आहे.

अनधिकृत बियाणे व्यवहारात फसगत झाल्यास कोठेही दाद मागता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी या संदर्भातील कोणत्याही फसव्या दाव्यांना बळी न पडता अधिकृत कृषी सेवा केंद्रातूनच बियाणे खरेदी करावी. अशा निविष्ठा खरेदीचे बिल घ्यावे. त्यामुळे फसगत झाल्यास विविध पातळीवर दाद मागता येणार आहे.
- प्रमोद लहाळे, विभागीय कृषी सहसंचालक, अमरावती

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Yeramala Yatra: येडेश्वरी देवीच्या जयघोषाने दुमदुमली येरमाळानगरी

Satara Agriculture Loss: सातारा जिल्ह्यात गारपीट,वादळी वाऱ्यामुळे शेतीचे नुकसान

Hapus Mango Prices: आवक वाढताच हापूसचे दर गडगडले

Electoral Roll Revision: कळंब तालुक्यात मतदार याद्यांचे पुनरीक्षण वेगात

Pre Monsoon Rain: नेवासा, पाथर्डी तालुक्यांत पूर्वमोसमी पावसाचा तडाखा

SCROLL FOR NEXT