Pune APMC  Agrowon
ॲग्रो विशेष

Pune APMC : बाजार समितीत बनावट पावत्या; वाहनचालकांना गंडा घालण्याचा प्रकार उघड

APMC Parking Scam : बाजार समितीच्या प्रवेशद्वार क्रमांक चार परिसरातून परराज्यातील वाहने बाजार समितीमध्ये प्रवेश करत असताना, मोठी वाहतूक कोंडी होते. या वाहतूक कोंडीत अनेक ट्रक अडकलेल असतात.

Team Agrowon

Pune News : पुणे बाजार समितीमध्ये संचालक मंडळ नियुक्त झाल्यापासून अनेक गैरप्रकार सुरू आहेत. यामध्ये बनावट पावती पुस्तकाद्वारे एकाच नंबरच्या पावतीद्वारे बाजार शुल्क वसुलीचा प्रकार उघड झाल्यानंतर आता बाजार समितीच्या नावे बनावट पावती पुस्तक तयार करून बेकायदा पार्किग शुल्क वसूल केले जात असल्याचा गैरप्रकार समोर आला आहे. यामध्ये प्रामुख्याने गुंडप्रवृत्तीच्या लोकांकडून परराज्यांतील शेतमाल वाहतुक करणाऱ्या वाहनचालकांना टार्गेट केले जात असल्याचे समोर आले आहे.

बाजार समितीच्या प्रवेशद्वार क्रमांक चार परिसरातून परराज्यातील वाहने बाजार समितीमध्ये प्रवेश करत असताना, मोठी वाहतूक कोंडी होते. या वाहतूक कोंडीत अनेक ट्रक अडकलेल असतात. याचाच फायदा घेत काही गुंडप्रवृत्तीचे लोक ‘एपीएमसी पुणे’ अशा ठळक अक्षरातील १२० रुपयांची छापील पावती पार्किंग शुल्क म्हणून आकारले जात असल्याचे प्रकार रासरोस पणे घडत आहे.

तर बाजार समितीचे अधिकृत प्रवेश शुल्क १० रुपये असताना, त्याचे ३० रुपये आकारले जात असल्याचे वाहन चालकांनी सांगितले, मात्र याबाबत बाजार समिती प्रशासानाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याची चर्चा बाजार आवारात आहे.

बाजार आवारात फळे भाजीपाला, कांदा, बटाटा, भुसार, केळी विभागात दररोज किमान एक हजार वाहनांमधून शेतमालाची आवक होत आहे. या वाहनचालकांकडून गैरमार्गाने धाकधटपशा करून अतिरिक्त पैसे वसूल केले जात असल्याचे ट्रक चालकांनी सांगितले.

बनावट पावतीद्वारे सेस वसुली चौकशी अहवाल गुलदस्तात

काही दिवसांपूर्वी एकाच क्रमांकाच्या दोन पावत्यांद्वारे सेस भरणा केल्याचे समोर आले होते. याबाबत पोलिस ठाण्यात लेखी तक्रारदेखील करण्यात आली होती. मात्र याबाबतचा चौकशी अहवाल गुलदस्त्यात आहे. यामध्ये काही संचालकांचा समावेश असल्याची चर्चा बाजार आवारात आहे.

बाजार समितीच्या बनावट पावतीद्वारे वसुलीचा हा प्रकार गंभीर असून पैसे वसूल करणाऱ्याची माहिती घेऊन, कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. संबधितांवर कारवाईसाठी पोलिसांकडे पाठपुरावा केला जाईल. आठ दिवसांत संबंधितांवर कारवाई होईल.
- दिलीप काळभोर, सभापती, बाजार समिती, पुणे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

NHB Subsidy Cut: लेखाजोखा ‘एनएचबी’चा!

AI in Agriculture: कृषीतील एआय, रोबोटिक्स, ड्रोन तंत्रज्ञानाला नवी दिशा

POCRA Project Audit: ‘पोकरा’ प्रकल्पाचे पूर्ण लेखापरीक्षण करा: किशोर तिवारी

Women’s Freedom and Equality: स्त्रीला जोखडात बांधणारी विचारसरणी उखडून फेका: राहुल गांधी

Kharif Crop Growth: खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील पिके बहरली

SCROLL FOR NEXT