Crop Insurance Scheme  Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance Registration : पीकविमा नोंदणीस ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ

Crop Insurance Scheme : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे राज्यातील सामूहिक सुविधा केंद्रांवर (सीएससी) ताण आहे.

बाळासाहेब पाटील

Mumbai News : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे राज्यातील सामूहिक सुविधा केंद्रांवर (सीएससी) ताण आहे. तसेच मागील वर्षीप्रमाणे काही शेतकऱ्यांना ३१ जुलैपर्यंत पीकविमा भरता येतो असा समज असल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी विमा भरलेला नाही.

त्यामुळे विमा भरण्यास मुदतवाढ द्यावी, अशी विनंती कृषी विभागाने केंद्र सरकारच्या कृषी विभागाकडे केली होती. तर कृषी विभागाच्या मुख्य सचिव व्ही. राधा यांनी केंद्रीय कृषी सचिवांना पत्र लिहिले होते.

मागील वर्षीपासून राज्यात एक रुपयांत पीकविमा योजना राबविल्याने त्यास मोठा प्रतिसाद मिळत आहे. मागील वर्षी १ कोटी ७० लाख शेतकऱ्यांनी पीकविमा भरला होता. त्यामुळे यंदाही तसाच प्रतिसाद मिळेल असे बोलले जात होते. मात्र, १२ जुलैअखेर १ कोटी १० लाख शेतकऱ्यांनी पीकविमा भरला आहे.

यंदाच्या खरीप हंगामातील पेरणी क्षेत्र १४२ लाख हेक्टर आहे. त्यापैकी विमा उतरवलेले क्षेत्र ७२ लाख हेक्टर आहे. हे क्षेत्र पेरणीक्षेत्राच्या ५० टक्के आहे. गेल्यावर्षी पीक विम्यासाठी १ कोटी ७० लाख शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. तर ११३ लाख हेक्टर क्षेत्राचा विमा उतरवला होता. हे क्षेत्र पेरणी क्षेत्राच्या ८० टक्के होते. मागील वर्षीही पीक विम्यास ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली होती.

यावर्षी जून-जुलैमध्ये झालेल्या चांगल्या पावसामुळे, शेतकरी पेरणीच्या कामात सतत व्यस्त आहेत. तसेच पाऊस आणि खराब हवामानामुळे ग्रामीण भागात इंटरनेट कनेक्टिव्हिटी अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे सीएससी केंद्रांवर नोंदणी करण्यास शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. त्यामुळे मुदतवाढ द्यावी, अशी मागणी केली होती. ती मान्य करण्यात आली आहे.

‘सीएससी’ केंद्रांवर ताण

महाराष्ट्र सरकारने नुकतीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे, या योजनेसाठी नावनोंदणी देखील सीएससी केंद्रांद्वारे केली जाते. त्यामुळे, सीएससी केद्रांवर दोन्ही योजनांची अर्ज नोंदणीची लगबग सुरू आहे.

त्याचा ताण या केंद्रांवर पडत आहे. तसेच गेल्या वर्षीप्रमाणे खरिपासाठीच्या पीक विम्यासाठीची अंतिम तारीख ३१ जुलै असल्याचा शेतकऱ्यांचा समज आहे. विमा योजना राबविणाऱ्या नऊ कंपन्यांनीही ३१ जुलैपर्यंत विमा नोंदणीस मुदतवाढ देण्यास संमती दिली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीन दरात चढ-उतार, गवार भावात घसरण, पालक आवकेत घट, वांगी दरात चढ-उतार तर डाळिंब दरात बदल

NCC Colonel Commandant Degree: कुलगुरू डॉ. शरद गडाख यांना मानद ‘कर्नल कमांडंट’ पदवी

Analog Paneer Ban: राज्यात कृत्रिम (एनालॉग) पनीरवर वर्षभराची बंदी

Water Conservation: श्रमदानातून पाणीदार झाले ‘सालईबन’

Maharashtra Rain Update: कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा इशारा; मराठवाड्यात हलक्या सरी शक्य

SCROLL FOR NEXT