Agricultural Export Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Export : निर्यातीचे वाहतूक भाडे कमी होऊनही निर्यात घटली

कोरोना काळात सर्व अर्थव्यस्था ठप्पा झाल्या होत्या. आयात निर्यातीवर त्याचा परिणाम झाला. जहाजे वेगवेगळ्या देशांच्या बंदरांवर थांबून होती.

Team Agrowon

Export News : कोरोनामुळे आयात निर्यातीत अडचणी येत होत्या. अनेक बंदरांवर जहाजे थांबून होती. त्यामुळे फ्रेटचे भाडे १८ हजार डाॅलरपर्यंत वाढले होते.

सध्या फ्रेट भाडे ७५० डाॅलरपर्यंत कमी झाले. पण जागतिक आर्थिक मंदीच्या स्थितीमुळे आयात निर्यात धीमी झाली. या संधीचा निर्यातदारांना फायदा घेता येत नाही. त्यामुळे शिपिंग कंपन्यांना व्यवसाय मिळत नाही.

कोरोना (CORONA) काळात सर्व अर्थव्यस्था ठप्प झाल्या होत्या. आयात निर्यातीवर त्याचा परिणाम झाला. जहाजे वेगवेगळ्या देशांच्या बंदरांवर थांबून होती. कंटेनर्स रिकामे करण्यास विलंब होत होता. त्यामुळे फ्रेट भाड्यामध्ये मोठी वाढ झाली होती.

२०२० ते २०२२ या काळात फ्रेटचे भाडे विक्रमी पातळीवर होते. भाडे १८ हजार डाॅलरपर्यंत वाढले होते. पण फ्रेट भाड्यामध्ये जानेवारी २०२३ पासून घट झाली. युरोपमधील दक्षिणेतील भागाती निर्यातीसाठीचे भाडे ७५० डाॅलरपर्यंत कमी झाले, असे वृत्त बिझनेसलाईनने दिले.

केरळमधील अलाप्पुझा येथील काॅयर निर्यातदार महादेवन पविथरन यांनी सांगितले की, आयातदार देशांमधून मागणी कमी झाल्याने काॅयर निर्यात ३० टक्क्यांनी घटली.

महागाई वाढल्यानंतर लोक जिवनाश्यक वस्तुंना प्राधान्य देतात. प्राधान्यक्रमानुसारच खरेदी होते. त्याचा फटका काॅयर निर्यातीला बसत आहे. त्यामुळे काॅयर निर्यात ३० टक्क्यांनी घटली. त्यामुळे दरात मोठी घट झाली.

जागतील अनेक देशांमध्ये सध्या आर्थिक मंदीचे सावट आहे. तसेच रशिया युक्रेन युध्दामुळे महागाई वाढली. त्यामुळे काॅयरला मागणी कमी आहे. परिणाम फ्रेटचे भाडे कमी होऊनही निर्यातदारांना फायदा घेता येत नाही.
महादेवन पविथरन, काॅयर निर्यातदार, अलाप्पुझा
मत्स्य निर्यात व्यवसायात मरगळ आली. अमेरिका आणि युरोपातून मागणी कमी झाली. त्यामुळे देशातून मत्स्य निर्यात १५ टक्क्यांनी घटली. देशातील वापर स्थिर आहे. त्यामुळं शिल्लक साठा राहत आहेत.
अॅलेक्स निनाण, अध्यक्ष, सीफूड एक्सपोर्टर्स असोसिएशन

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

SCROLL FOR NEXT