Crop Advisory Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Advisory : कोकण विभातील पिकांसाठी कृषी सल्ला

Crop Protection : काळीमिरीच्या घोसातील १ ते २ दाणे पिवळे किंवा तांबडे लाल झाल्यावर मिरीची काढणी करावी.

Team Agrowon

काळी मिरी

पक्वता

काळीमिरीच्या घोसातील १ ते २ दाणे पिवळे किंवा तांबडे लाल झाल्यावर मिरीची काढणी करावी. काढणीनंतर दुसऱ्या दिवशी मिरीचे दाणे घोसापासून वेगळे करून बांबूच्या करंडीत किंवा मलमलच्या कापडात भरून उकळत्या पाण्यात एक मिनिटे बुडवावेत. त्यानंतर उन्हामध्ये ३ ते ४ दिवस चांगले वाळवावे.

पालेभाजी पिके

माठ आणि कोथींबीर लागवडीसाठी २०० ते २५० किलो आणि मुळ्यासाठी १०० किलो चांगले कुजलेले शेणखताची मात्रा प्रति गुंठा या प्रमाणात द्यावी.

माठ, कोथींबीर बियाणांची दोन ओळींत २० ते २५ सेंमी, तर मुळ्याची ४५ ते ६० सेंमी अंतर ठेवून पेरणी करावी. पेरणी टप्प्याटप्प्याने आठवड्याच्या किंवा १५ दिवसांच्या अंतराने करावी.

कलिंगड

वाढीची अवस्था

कलिंगड पिकामध्ये नाग अळीच्या प्रादुर्भाव दिसून येण्याची शक्यता आहे. नागअळी पानाच्या आत शिरून आतील भाग खाते. त्यामुळे पानावर नागमोडी रेषा दिसून येतात.

प्रादुर्भाव दिसून येत असल्यास नियंत्रणासाठी,निबोळी अर्क ५ टक्के किंवा अझाडिरेक्टीन (१० हजार पीपीएम) २० मिलि प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

केळी

शाखीय वाढीची अवस्था

नवीन लागवड केलेल्या केळी बागेस नत्राची मात्रा (४०० ग्रॅम युरिया) लागवडीनंतर ६०, ९० आणि १२० दिवसांनी समप्रमाणात विभागून द्यावी. खतमात्रा बांगडी पद्धतीने ३० सें.मी. अंतरावर जमिनीत १० सें.मी. खोल आणि २० ते २५ सें.मी. रुंद चरात द्यावी.

थंडीत वाढ होत असल्याने केळीच्या झाडांची पाने पिवळी पडू लागतात. तसेच घडाची निर्मिती मंदावते. घडामधील फण्याची व फळांची संख्या कमी होऊन आकार ही लहान होतो. त्यामुळे घडाभोवती पाने गुंडाळावीत.

बागेत संध्याकाळच्या वेळेस सिंचन करण्यावर भर द्यावा. बागेत जागोजागी पालापाचोळा पेटवून धूर करावा. जेणेकरून बागेतील तापमान नियंत्रित राहण्यास मदत होईल.

वाफसा स्थितीचा अंदाज घेऊन सिंचन करण्यावर भर द्यावा.

- ८१४९४६७४०१

(कृषी विद्या विभाग आणि ग्रामीण कृषी मौसम सेवा, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Dues : थकीत ऊस बिलासाठी १० ऑगस्टला ठिय्या आंदोलन

Crop Damage Compensation: सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा, शेतपिकांच्या नुकसानीसाठी ५ कोटी ५४ लाख मदत मंजूर

MAT Stay : भूवैज्ञानिक भरतीला ‘मॅट’कडून अंतरिम स्थगिती

Farmer Loan Waiver: आधार ई-केवायसीसाठी शुल्क आकारल्यास कठोर कारवाई : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

SCROLL FOR NEXT