Gharkul Scheme  Agrowon
ॲग्रो विशेष

Maha Awas Yojana : ‘महाआवास’मध्ये जळगाव चमकले

Jalgaon Gharkul Scheme : महाराष्ट्र सरकारने २०२१-२२ मध्ये राबविलेल्या महाआवास अभियानात जळगाव जिल्ह्याने पंतप्रधान आवास व राज्यपुरस्कृत घरकुल योजनेत विविध संवर्गात उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम व द्वितीय क्रमांक पटकाविला.

Team Agrowon

Jalgaon News : महाराष्ट्र सरकारने २०२१-२२ मध्ये राबविलेल्या महाआवास अभियानात जळगाव जिल्ह्याने पंतप्रधान आवास व राज्यपुरस्कृत घरकुल योजनेत विविध संवर्गात उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम व द्वितीय क्रमांक पटकाविला.

पंतप्रधान आवासच्या ग्रामीण व राज्य योजनेत भूमिहीन लाभार्थ्यांना जागा देण्यात जिल्ह्याने राज्यात द्वितीय क्रमांक मिळविला. केंद्र व राज्यपुरस्कृत ग्रामीण गृहनिर्माण योजनांच्या अंमलबजावणीत गतिमानता व गुणवत्ता आणण्यासाठी राज्यात ‘महाआवास अभियान २०२३-२४’ राबविण्यात येत आहे.

या कार्यक्रमात ‘महाआवास अभियान २०२१-२२’ मध्ये राबविलेल्या उपक्रमांचे मूल्यमापन करून उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्था व व्यक्तींना ‘महाआवास अभियान पुरस्कार’ व ‘महाआवास अभियान विशेष पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येईल.

महाआवास अभियान पुरस्कारात पंतप्रधान आवास योजना-ग्रामीणमध्ये सर्वोत्कृष्ट जिल्ह्यात आणि महाआवास अभियान विशेष पुरस्कारात भूमिहीन लाभार्थ्यांना जागा देण्यात जळगाव जिल्ह्याने द्वितीय क्रमांक पटकाविला.

पंतप्रधान आवास योजना ग्रामीणमध्ये घरकुलांचा उद्दिष्टांप्रमाणे १०० टक्के मंजुरी देण्यात आणि राज्यपुरस्कृत आवास योजनेत घरकुलांच्या उद्दिष्टांप्रमाणे १०० टक्के मंजुरी देण्यात व पंतप्रधान आवास योजना ग्रामीण व राज्य योजनेत बहुमजली इमारत बांधण्यात जिल्ह्याने तृतीय क्रमांक मिळविला. लाभार्थ्यांना जागा करून देण्यासाठी ‘लँड बँक'' तयार करण्यात जिल्ह्याने द्वितीय क्रमांक मिळविला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT