Ethanol Agrowon
ॲग्रो विशेष

Ethanol Pump Station : महाराष्ट्रासह चार राज्यांत इथेनॉलचे पंप उभारण्यात येणार

Ethanol Fuel : इथेनॉलच्या वापरामुळे शेतकऱ्यांचा फायदा होत असून त्यावर आता वाहने चालणार आहे. त्यासाठी सर्व कंपन्यांकडून वाहनांची निर्मिती सुरू आहे.

Team Agrowon

Kolhapur News : इथेनॉलच्या वापरामुळे शेतकऱ्यांचा फायदा होत असून त्यावर आता वाहने चालणार आहे. त्यासाठी सर्व कंपन्यांकडून वाहनांची निर्मिती सुरू आहे. लवकरच महाराष्ट्रासह चार राज्यांत इथेनॉलचे पंप उभारण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार राहुल आवाडे यांच्या प्रचारार्थ शहापूर चौकात झालेल्या निर्धार सभेत ते बोलत होते. मंत्री गडकरी म्हणाले, की केंद्र सरकारने अलीकडच्या काळात इथेनॉल उत्पादन वाढीसाठी महत्त्वाची पावले उचलली आहेत.

पेट्रोल सारख्या इंधनावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी इथेनॉलचे उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न केले आहेत. याचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे. यापूर्वी मक्याला बाराशे रुपये क्विंटल पर्यन्त दर मिळत होता.

मक्यावर आधारित इथेनॉल प्रकल्प झाले आणि इथेनॉलला दुप्पट दर मिळू लागला. औद्योगीकरणाबरोबरच शेतकऱ्यांच्या हितासाठी ही केंद्राने प्रयत्न केले. आर्थिक अरिष्टात असणाऱ्या साखर उद्योगाला इथेनॉल निर्मितीने मोठा आधार दिला.

आज जे साखर कारखाने सावरले आहेत त्यामध्ये मोठा वाटा इथेनॉलचाही आहे. मला ज्या ज्या वेळी कारखानदार भेटतात त्यावेळी ते इथेनॉलच्या प्रकल्पाबाबतची उपयोगिता सांगतात. केवळ साखरेपासूनच इथेनॉल तयार न करता मका व बांबू सारख्या पिकापासून ही इथेनॉल तयार करण्यासाठीही आम्ही प्रयत्न करत आहोत

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Market : पुसद बाजार समितीत चोवीस हजार क्विंटल सोयाबीन खरेदी

Agriculture Irrigation : ‘धरणातून रब्बी हंगामासाठी पाणी आवर्तने सोडा’

Agriculture Department : दोन महिन्यांत अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती करा

Farm Pond : धाराशिवला दहा वर्षांत उभारली ४ हजार २६२ शेततळी

Tree Cutting Tender : हजारो झाडांचा अवघ्या दीड लाखाला सौदा

SCROLL FOR NEXT