Ethanol Agrowon
ॲग्रो विशेष

साखर कारखान्यांना इथेनॉल पंपांची परवानगी देणार

पेट्रोलला पर्याय म्हणून पुढे आलेल्या इथेनॉलला चालना देण्याची गरज आहे. नगर जिल्ह्यात ऊस आणि साखर कारखाने भरपूर आहेत.

टीम ॲग्रोवन

नगर : ‘‘पेट्रोलला पर्याय म्हणून पुढे आलेल्या इथेनॉलला (Ethanol) चालना देण्याची गरज आहे. नगर जिल्ह्यात ऊस (Sugarcane) आणि साखर कारखाने (Sugar Mills) भरपूर आहेत. येथील नेत्यांनी ठरविले तर आम्ही कारखान्यांना इथेनॉल पंपांची (Ethanol Pump) परवानगी देऊ, अशी ग्वाही केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी दिली.

अकोले येथे शुक्रवारी (ता. १७) येथे झालेल्या कार्यक्रमात गडकरी बोलत होते. या वेळी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री मधुकर पिचड, आमदार मोनिका राजळे, बाळासाहेब मुरकुटे आदी उपस्थित होते.

गडकरी म्हणाले, ‘‘नगर जिल्हा ऊस आणि साखरेसाठी प्रसिद्ध आहे. मात्र आता पारंपरिक पद्धतीने केवळ उसापासून साखर निर्माण करण्याचे दिवस गेले. आता पेट्रोलला पर्याय म्हणून पुढे आलेल्या इथेनॉलची निर्मिती आणि विक्री केली पाहिजे.

दरवर्षी आपल्याला दहा लाख कोटी रुपये इंधनासाठी खर्च करावे लागतात. यातील बराचसा पैसा बाहेर जातो. हा पैसा शेतकऱ्यांच्या घरात कसा जाईल, याचा विचार केला पाहिजे. उसापासून थेट इथेनॉल निर्मिती आता शक्य आहे. शिवाय इथेनॉल आणि पेट्रोल दोघांची ऊर्जा क्षमता सारखीच असल्याचेही आढळून आले आहे. तुलनेत स्वस्त असलेले इथेनॉल वाहनचालकांना परवडेल. हवी ती मदत करायला आम्ही तयार आहोत. साखर कारखाने आणि राजकारणात आलेल्या नव्या पिढीने यासाठी पुढाकार घ्यावा.’’

आदिवासी भागातील कच्च्या मालापासून नवी उत्पादने करून आदिवासींचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

‘जे बोलतो, ते करून दाखवतो’

नितीन गडकरी म्हणाले, ‘‘तुम्ही म्हणाल हे नुसतेच बोलतात. मंत्री असेच असतात. मात्र इतरांसारखे माझे नाही. आला आणि बोलून गेला, असे माझे नाही. जे होणार आहे, तेच मी बोलतो आणि जे बोलतो, ते करून दाखवितो.’’

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cabbage Farming: कोबी पिकात आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब

Brazil Agricultural Cooperation: ब्राझीलसोबत कृषी क्षेत्रामध्ये सहकार्य संधी

Onion MSP Demand: कांद्याला तातडीने प्रतिक्विंटल २ हजार हमीभाव, १,५०० रुपये अनुदान देण्याची मागणी

Akola Heatwave: अकोला जिल्ह्यात अति उष्णतेमुळे होरपळ

Mini kit Seeds Application: मिनीकिट बियाण्यांसाठी अर्जाचा आज शेवटचा दिवस

SCROLL FOR NEXT