VNMKV Research Agrowon
ॲग्रो विशेष

VNMKV Parbhani : ‘वनामकृवि’अंतर्गत समित्या स्थापन

Latest Agriculture News : त्या अनुषंगाने आवश्यक कार्यवाही करण्यासाठी कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांच्या मान्यतेने शुक्रवारी (ता.१३) विद्यापीठ स्तरावर एकूण सात समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत.

माणिक रासवे

Parbhani News : छत्रपती संभाजी नगर येथे १६ सप्टेंबर रोजी झालेल्या मंत्री मंडळाच्या बैठकीत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ अंतर्गत छत्रपती संभाजीनगर, बीड जिल्ह्यात नवीन शासकीय कृषी महाविद्यालये, संशोधन केंद्र तर नांदेड येथे कृषी महाविद्यालय, बीड जिल्ह्यात कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, सोयाबीन संशोधन उपकेंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

त्या अनुषंगाने आवश्यक कार्यवाही करण्यासाठी कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांच्या मान्यतेने शुक्रवारी (ता.१३) विद्यापीठ स्तरावर एकूण सात समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. महाविद्यालये स्थापनेसाठीच्या समितीचे अध्यक्ष डॉ. यू. एम. खोडके आहेत. तर संशोधन केंद्र स्थापनेसाठीच्या समितीचे अध्यक्ष डॉ. दत्तप्रसाद वासकर आहेत.

या चार सदस्यीय समित्यांचे नोडल अधिकारी तथा सदस्य सचिव म्हणून प्राचार्य, विभाग प्रमुख, प्राध्यापक, संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी हे आहेत. सदस्यांमध्ये विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य, प्राध्यापक यांचा समावेश आहे.

या समित्या संबंधित ठिकाणी महाविद्यालय व संशोधन केंद्र स्थापनेसाठी आवश्यक जमीन महसूल विभागाकडून विद्यापीठाकडे हस्तांतरित करून घेणे, तसेच राज्य शासनाकडून निधी प्राप्त करून घेणे आदी कार्यवाही करून केलेल्या कार्यवाहीचा कुलगुरूंकडे अहवाल सादर करतील, असे कुलसचिव पी. के. काळे यांनी सांगितले.

छत्रपती संभाजीनगर येथील मंत्री मंडळाच्या बैठकीतील निर्णयानुसार सोयगाव (जि. छत्रपती संभाजीनगर), जिरेवाडी (ता. परळी वैजनाथ, जि. बीड), नांदेड येथे कृषी महाविद्यालये, जिरेवाडी (ता. परळी वैजनाथ, जि. बीड) येथे कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय स्थापण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

शुक्रवारी (ता. १३) जिरेवाडी, नांदेड येथे महाविद्यालये स्थापनेचे शासन निर्णय काढण्यात आले आहेत. जिरेवाडी (ता. परळी, वैजनाथ, जि. बीड) येथे सोयाबीन संशोधन, प्रशिक्षण व प्रकिया उपकेंद्र स्थापण्याचाही निर्णय झाला आहे. तर कोटनांद्रा व डोईफोडा (ता. सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर) येथे मका संशोधन केंद्र स्थापनेचा शासन निर्णय यापूर्वी झालेला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT