Pune APMC  Agrowon
ॲग्रो विशेष

Pune APMC : नाल्यावरील अतिक्रमण काढा

Encroachment : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये संचालक मंडळाच्या आशीर्वादाने अतिक्रमणांचा सुळसुळाट झाला आहे.

Team Agrowon

Pune News : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये संचालक मंडळाच्या आशीर्वादाने अतिक्रमणांचा सुळसुळाट झाला आहे. यामधील भुसार विभागातील एका व्यापाऱ्याने थेट नाल्यावरच अतिक्रमण केल्याचे समोर आले आहे.

याबाबत संबंधितास बाजार समितीने तीन दिवसांत अतिक्रमण काढण्याच्या नोटीची बरोबरच ५० हजार रुपये दंडही केला आहे. तसेच अतिक्रमण न काढल्यास ते बाजार समिती काढून टाकेल आणि त्याचा दंड वसूल केला जाईल, असे नोटिशीत म्हटले आहे.

याबाबतची माहिती पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव डॉ. राजाराम धोंडकर यांनी दिली. भुसार बाजारातील सारा ट्रेडर्स २१९ या फर्मला नोटीस दिल्याचे सांगितले. यामुळे सर्व अनधिकृत बांधकामे पाडणार की, काहींना संरक्षण मिळणार असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

संबंधित नोटीस धारकाने गाळ्यावर अनधिकृत शेड बांधले तसेच शेजारीच असलेल्या नाल्यावर अतिक्रमण केले आहे. हे शेड अनधिकृतरीत्या उभारण्यात आले आहे. शेडमुळे व्यापारावर तसेच वाहतुकीवर परिणाम होत आहे., हे अतिक्रमण काही दिवसांनी नियमित करण्याचा डाव होता.

मात्र प्रशासनाने अतिक्रमण काढण्याची नोटीस दिल्याने डाव फसला आहे. दरम्यान, बाजार आवारात अनेक अतिक्रमणे, गाळ्यांमध्ये नियमबाह्य बदल, हॉटेलमध्ये नियमबाह्य बदलांबरोरच साइड पट्ट्यामध्ये अतिक्रमणे केली आहेत. या अतिक्रमणांवर बाजार समितीचा हातोडा पडणार की, जाणीवपूर्वक दुर्लक्ष होणार याबाबतची चर्चा बाजार आवारात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tree Plantation: नाशिकमध्ये एक लाख वृक्ष लागवडीचा संकल्प

Power Supply Issue: वीज कपातीमुळे पिके धोक्यात; संतप्त शेतकऱ्यांचा महावितरणवर धडक मोर्चा

Farm Loan Waiver: कर्जमाफीसाठी ॲग्रीस्टॅक नोंदणी आवश्यक

Crop Damage Compensation: कोकणातील १ लाख ३४ हजार शेतकऱ्यांना दिलासा; २०९ कोटी मदत मंजूर, शासन निर्णय जारी

Nashik Rain Update: नाशिक जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरी

SCROLL FOR NEXT